शिवसेनेच्या नेत्यांचे आव्हान, ‘ताजमहाल’मध्ये घुसून दर श्रावण सोमवारी ‘आरती’ करणार

नवी दिल्ली : वृत्तंसस्था – आग्र्यामध्ये एक अजब प्रकार घडला आहे. आग्र्याच्या एका शिवसेनेच्या नेत्याने थेट ताजमहालला लक्ष केले आहे. या शिवसेनेच्या नेत्याने पुरातत्व खात्याला सांगितले आहे की तो थेट ताजमहालमध्ये घूसून आरती करणार आहे. एवढेच नाही तर ही आरती श्रावण महिन्यात दर सोमवारी करणार असल्याची धमकी दिली आहे. याकारणाने पुरातत्व विभागाने आग्रा जिल्हा प्रशासनाला ताजमहालची सुरक्षा वाढवण्याची विनंती केली आहे.

पुरातत्व विभागाने पत्र लिहून माहिती दिली की, १९५८ च्या ऐतिहासिक स्थळांसाठी करण्यात आलेले कायद्यानुसार या वास्तूंना संरक्षण देण्यात आले आहे. शिवसेना नेते विणू लवानिया यांनी १७ जुलैला तेथील जिल्हा प्रशासनाला आणि पोलिसांना आव्हान दिले होते की, त्यांना ताजमहालमध्ये जाऊन आरती करण्यापासून अडवून दाखवावे.

ताजमहाल हे शिवशंकराचे ‘तेजो महालय’

शिवसेना नेते लवानिया म्हणाले की ताजमहाल हे मुसलमान लोकांचे नसून ते ‘तेजो महालय’ आहे, जे भगवान शंकराचे मंदिर आहे. आम्ही श्रावण महिन्यात प्रत्येक सोमावरी ‘तेजो महालय’मध्ये जाऊन आरती करणार आहेत. पुरातत्व खात्याच्या आग्रा विभागाच्या वसंत स्वरानकर यांना सांगितले की तेथे कोणत्याही प्रकारची आरती किंवा पूजा करता येणार नाही. ते असे ही म्हणाले की त्यांनी स्थानिक प्रशासनाला ताजमहालच्या बाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यास सांगितले आहे.

या आधी देखील घडले असे प्रकार

ताजमहालमध्ये जाऊन पूजा करणाऱ्याची धमकी देणारा हा पहिला प्रकार नाही, याआधी देखील असे प्रकार घडले आहेत. मागील वर्षी ही उजव्या विचारसरणीच्या महिलांना आपण ताजमहालच्या मस्जिदमध्ये जाऊन पूजा करणार आहेत. ताजमहाल हा सत्यात शिव शंकाराचे मंदिर आहे. या प्रकरणानंतर देखील गोंधळ उडाला होता. २००८ साली देखील शिवसेनेच्या एका गटाने ताजमहालमध्ये घूसून हिंदूू पद्धतीने पूजा करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते.

आरोग्यविषयक वृत्त