जैशच्या दहशतवाद्याने केली NSA अजीत डोभाल यांच्या ऑफिसची ‘रेकी’, Video मिळाल्याने सुरक्षा यंत्रणा ‘अलर्ट’वर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजीत डोभाल यांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. जैशशी संबंधीत हिदायत-उल्लाह मलिक यांच्याकडून डोभाल यांच्या ऑफिसच्या रेकीचा व्हिडिओ मिळाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. काश्मीरमध्ये शोपियांमध्ये राहणार्‍या मलिकला 6 फेब्रुवारीला अटक करण्यात आली होती.

सांगितले जात आहे की, ही रेकी मागच्या वर्षी करण्यात आली होती. मलिकने डोभाल यांचे ऑफिस आणि श्रीनगरमध्ये इतर भागांचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. मलिकने हे व्हिडिओ आपल्या आकांना पाकिस्तानात पाठवले होते. याची माहिती मिळताच सुरक्षा एजन्सीज अलर्ट झाल्या आहेत.

याबाबत एक एफआयआर सुद्धा नोंदला गेला आहे. जम्मूच्या गंग्याल पोलीस स्टेशनमध्ये मलिक विरूद्ध युएपीचे कलम 18 आणि 20 अंतर्गत केस दाखल केली आहे. मलिक हा जैशचा फ्रंट ग्रुप लश्कर-ए-मुस्तफाचा प्रमुख सांगितले जात आहे. त्यास अनंतनागमध्ये अटक करण्यात आली होती. मलिककडून शस्त्र आणि स्फोटके जप्त करण्यात आली होती.

दशहत पसरवण्याचा कट
गुप्तचर एजन्सीनुसार, पाकिस्तानातील दशहतवादी संघटना जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दशहतवाद पसरवण्याचा कट रचण्याच्या प्रयत्नात आहेत. गुप्तचर एजन्सीजने गृह मंत्रालयाला सांगितले की, जम्मू-काश्मीरमध्ये जम्मात-ए-इस्लामी लश्कर, जैश, हिजबुल मुजाहिदीनला मोठी निधी देण्याची तयारी करत आहे.

पाकिस्तानची गुप्तचर एजन्सी आयएसआयद्वारे, दुबई तुर्कीच्या मार्गाने फंडिंग पुरवले जात आहे. जम्मू काश्मीरमध्ये फुटीरतवाद पार्ट-2 सुरू करण्याचा कट रचला जात आहे. जकात, मौदा, बैत-उल-माल, परदेशातून आलेली चॅरिटी, हेल्थ आणि एज्युकेशनच्या नावावर दुबई, तुर्की आणि अन्य मार्गाने फंडिंग केले जात आहे.