शरद पवार यांच्या बारामतीतील निवासस्थानी सुरक्षा वाढवली; उजनीचे 5 टीएमसी पाणी इंदापूरला देण्याचा वाद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बारामतीमधील माळेगाव येथील गोविंदबाग या निवासस्थानावरील सुरक्षा व्यवस्था वाढविली आहे.
उजनीचे ५ टीएमसी पाणी इंदापूर तालुक्याला देण्याचा शासनाने निर्णय नुकताच घेतला होता. हा निर्णय जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी रद्द केला आहे.

त्यावरुन उजनीचे पाणी पेटले आहे. इंदापूर तालुक्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरु झाली आहेत. त्याचबरोबर स्थानिक राष्ट्रवादी कार्यकर्त्यांसह शेतकरीही आक्रमक झाले आहेत. दुसर्‍या बाजूला सोलापूर जिल्ह्याने उजनीतून इंदापूर तालुक्याला पाणी देण्यास विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर मोहोळ तालुक्यातील शेतकरी गोविंदबागेसमोर आंदोलनासाठी येणार असल्याने हा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

आंदोलनासाठी आलेल्या दोन शेतकºयांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़ नेमके आंदोलन कधी होणार याविषयी माहिती मिळालेली नाही़ मात्र, त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे़