त्रालमध्ये जैशचा टॉप कमांडर ‘गोत्यात’, बांदीपुर्‍यात 7 आंतकवादी अटकेत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथे शनिवारी सकाळपासूनच अतिरेकी आणि सुरक्षा दलातील चकमकी सुरू आहेत. सुरक्षा दलाने जैश-ए-मोहम्मदचा एक टॉप कमांडर, कारी यासीर आणि अन्य दोन दहशतवाद्यांना घेरले आहे. तसेच दुसरीकडे, सुरक्षा दलांना आणखी एक मोठे यश मिळाले असून बांदीपुरा येथून सुरक्षा दलांनी 7 दहशतवाद्यांना अटकही केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कारी यासिर जैशसाठी जिहादी तयार करण्याचे काम करते. सुरक्षा दल बर्‍याच दिवसांपासून या शोधात होते

शुक्रवारी (24 जानेवारी) कारीर यासिरचा साथीदार अबू सैफुल्ला उर्फ अबू कासिम सुरक्षा दलांच्या चकमकीत ठार झाला. दक्षिण काश्मीरमध्ये चकमकीत सुरक्षा दलांनी कासिमला ठार केले. मिळालेल्या माहितीनुसार, कासिम दक्षिण काश्मीरमधील त्राल आणि ख्रेव भागात एका वर्षापेक्षा जास्त काळ कार्यरत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारलेला दहशतवादी ५ ऑगस्ट रोजी कलम ३७० रद्द केल्यानंतरच्या हत्याकांडात सामील होता. असे म्हटले जात आहे की एसपीओला धमकावलेली पोस्टर्स लावण्यातदेखील याचा सहभाग होता, तर स्थानिक नसलेल्या मजुरांना खोरे सोडण्यास सांगितले गेले होते.

फेसबुक पेज लाईक करा –