जम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या 2 दहशतवाद्याचा ‘खात्मा’ !

श्रीनगर : वृत्तसंस्था – भारत जम्मू-काश्मीरमध्ये सातत्याने सुरू असलेला दहशतवाद्यांच्या कुरघोडींचाा सामना करत आहे. काश्मीरमधील कुलगाम सेक्टरमध्ये काल दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चमकीत दोन हिजबुलचे दहशतवादी ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. या चकमकीदरम्यान सुरक्षा दलातील एक जवान जखमी झाला असून त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

कुलगामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. जवानांनी या परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत दोन जणांना ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. लष्करी अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठार झालेले दहशतवादी हिजबुल संघटनेशी संबंधित होते. त्यापैकी एक दहशतवादी अली भाई उर्फ हैदर हा परदेशी होता. तर दुसर्‍या दहशतवाद्याची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. चकमक झालेल्या ठिकाणहून शस्त्रास्र आणि इतर सामान जप्त करण्यात आले आहे.