Corona Vaccine : लस घेणार्‍या सुरक्षा रक्षकाला ‘अ‍ॅलर्जी’ !

नवी दिल्ली : एम्स येथे कोवॅक्सिनची लस (Corona Vaccine) घेतल्यानंतर तेथील सुरक्षा रक्षकाला त्याची रिएक्शन आली असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लस (Corona Vaccine) घेतल्यानंतर १५ ते २० मिनिटात या सुरक्षा रक्षकाच्या अंगावर पुरळ उठल्याचे आढळून आले.

याबाबत एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांच्या म्हणण्यानुसार २० वर्षाच्या सुरक्षा रक्षकाला दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास लस देण्यात आली. त्यानंतर १५ ते २० मिनिटात त्याच्या त्वचेवर पुरळ उठू लागले. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. त्याला रविवारपर्यंत निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.

दिल्लीमध्ये ४ हजार ३१९ जणांना पहिल्या दिवशी लस देण्यात आली. त्यापैकी ११ जणांना किरकोळ त्रास झाला. निरीक्षण वेळेमध्ये ते पुन्हा नॉर्मल झाले. एक केस गंभीर असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.