पिंपरी येथे सुरक्षा रक्षकाचा खून

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  भांडण झालेला सुरक्षा रक्षक मिळाला नाही म्हणून त्याच्या सहकारी सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण करुन खून करण्यात आला. ही घटना मोरवाडी, पिंपरी येथे घडली.
राजू गोपाळ जानराव (36, रा. लालटोपीनगर, पिंपरी) असे खून झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी रफीक अमीर मनेर (45, रा. वाघेरे पार्क, पिंपरीगाव) यांनी फिर्याद दिली आहे. तर पोलिसांनी तीन अज्ञात हल्लेखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

राजू जानराव हे सुरक्षा रक्षकाचे काम करतात. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या दुसऱ्या सुरक्षा रक्षकाचे काही तरुणांशी भांडण झाले होते. त्या सुरक्षा रक्षकाला मारण्यासाठी ते तीन तरुण हातात लाकडी दांडके घेऊन आले होते. मात्र तो सुरक्षा रक्षक मिळाला नाही म्हणून हल्लेखोर तरुणांनी जानराव याच्याशी हुज्जत घातली.

त्यानंतर जानराव यास स्मशानभूमीजवळ लाकडी दांडक्‍याने मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या जानराव याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांच्या मृत्यू झाला. तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like