COVID-19 : अभिनेत्री रेखाच्या घरात ‘कोरोना’ची ‘एन्ट्री’ ! बंगला केला ‘सील’

कोरोना व्हायरसनं देशासह जगभर धुमाकूळ घातला आहे. सामान्यांसह अनेक सेलेब्रिटी देखील कोरोनाच्या विळख्यात सापडताना दिसत आहेत. आजवर अनेक सेलेब्सची नावं समोर आली आहे. या सगळ्यानंतर आता बॉलिवूड स्टार रेखा हिच्या घरातही करोनाचा शिरकाव झाल्याचं समोर आलं आहे. यानंतर अभिनेत्री रेखाचा बंगला सील करण्यात आला आहे.

अभिनेत्री रेखाच्या घरात कोरोनाचा शिरकाव

बॉलिवूड स्टार रेखाच्या घरात कोरोनानं एन्ट्री केली आहे. वांद्र्यातील बँडस्टँड परिसरात रेखाचा बंगला आहे. रेखाच्या दोन सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या कोरोना पॉझिटीव्ह या दोन्हीही सुरक्षारक्षकांवर उपचार सुरू आहे. अशीही माहिती आहे की, मुंबई महानगरपालिकेनं संपूर्ण परिसर सॅनिटाईज केला आहे. असं असलं तरी अभिनेत्री रेखाकडून मात्र अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

रेखाच्या सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण झाल्यानंतर महानगरपालिकेनं रेखाचा मुंबईतील बंगला सील केला आहे. तिच्या बंगल्याबाहेर कंटेन्मेंट झोन असल्याचा फलकही लावण्यात आला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like