ATM मशीनजवळ ‘गार्ड’ अभ्यास करत होता; IAS अधिकार्‍याने शेअर केला फोटो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एक मनोरंजनाच भाग म्हणून सोशल मीडिया पाहिले जाते. आपण सोशल मीडियावर अनेकदा वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना पाहतो. यातील काही फोटो पाहून मनाला खूप वेदना होतात. तशाच पद्धतीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इंटरनेटवर व्हायरल होणारा हा फोटो एका सिक्युरिटी गार्डचा आहे. जो ATM मशीनच्या शेजारी जमिनीवर बसला आहे. जो ड्युटी सांभाळून स्वत:चा अभ्यासही करत आहे. तो फोटो पाहून तुम्हीही भावूक व्हाल.

फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए” या फोटोत आपण पाहू शकता की, कशाप्रकारे एक सिक्युरिटी गार्ड ATM मशीनजवळ जमिनीवर बसला आहे. हा फोटो पाहून या सिक्युरिटी गार्डला आयुष्यात काहीतरी करण्याची आणि बनण्याची किती जिद्द आहे ते दिसून येते. या फोटोला आतापर्यंत ८ हजारापेक्षा अधिक जणांनी लाईक्स केलं आहे. सिक्युरिटी गार्डचं कौतुक होत असून त्याच्या जिद्दीला युजर्स सलाम करत आहेत. हा फोटो पाहून तुम्हालाही प्रेरणा मिळेल. हा फोटो सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला आहे. हा फोटो आयएएस अधिकारी अविनाश शरण यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.