तुमच्या वाहनाच्या नंबरप्लेटचा शेवटचा आकडा ‘1’ आहे ? तर तुमच्यासाठी ही बातमी आहे महत्त्वाची

नवी दिल्ली : अनेक वाहनचालक वाहनाचा क्रमांक आपल्या आवडीनुसार निवडतात. त्यासाठी कितीही पैसे मोजण्यास तयार असतात. पण अशा काही वाहनाचालकांच्या खिशाला आता कात्री बसणार आहे. जर आपल्या वाहनाच्या नंबरप्लेटचा शेवटचा आकडा एक असेल तर तुम्हाला 15 जुलै, 2021 पर्यंत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणे बंधनकारक असणार आहे.

परिवहन विभागाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, जर आपल्या वाहनावर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नसेल तर तुम्हाला दंड आकारला जाऊ शकतो. तसेच माल वाहतूक करणाऱ्या वाहनावर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नसेल तर फिटनेस सर्टिफिकेटही मिळणार नाही.

तसेच ज्या जुन्या वाहनांच्या नंबर प्लेटचा शेवटचा आकडा एक किंवा शून्य असेल अशा वाहनचालकांना 15 जुलै, 2021 पर्यंत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.

दरम्यान, याबाबतचे परिपत्रक उत्तर प्रदेश राज्यात निघाले असून, ही नवी नियमवाली 15 जुलै, 2021 नंतर लागू होईल आणि दंडाची रक्कमही वसूल केली जाणार आहे.

असे क्रमांक असल्यास हाय सिक्युरिटी नंबर प्लेट गरजेची…

11 ,20, 21, 30, 31, 40, 41, 50, 51,61, 70, 71, 80, 81, 90,91