नेहा धुपिया आणि पती अंगद बेदी यांचे इंटिमेट फोटो आणि व्हिडीओ व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री नेहा धुपियाचे तिच्या पतीसोबतचे काही इंटिमेट फोटो समोर आले आहे. सध्या नेहाचे हे फोटो सोशवर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. नेहा धुपिया तिचे लग्न आणि तिने बाळाला जन्म दिल्यानंतर खूपच चर्चेत आली होती. आता पुन्हा एकदा नेहा धुपिया चर्चेत आली आहे. तिचे आणि तिच्या पतीचे काही इंटिमेट फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

नेहाच्या व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये दिसत आहे की, नेहा तिचा पती अंगद बेदी याच्या मिठीत अगदी हरवून गेली आहे. काही फोटोंमध्ये ती अंगदला किस करतानाही दिसत आहे. हे सर्व फोटो नेहाचे पती अंगदने त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले होते. हे फोटो आता सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहे.

दरम्यान नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांचे हे फोटो व्हायरल होणे हे त्यांच्यासाठी काही नवीन नाही. याआधीही त्यांचे असे अनेक फोटो आणि व्हिडीओदेखील व्हायर झाले आहेत. त्यात नेहा आणि अंगद रोमांस करताना दिसत आहेत. तिच्या अनेक इंटिमेट मुमेंट्सचे फोटो सोशलवर चर्चेत आले आहेत.

अंगद बेदी केवळ टीव्ही अभिनेता नसून तो वेब सिरीजमध्येही काम करतो. नेहाचे फोटो पाहून लगेत लक्षात येते की, नेहा तिच्या खासगी आयुष्यात खूपच आनंदी आहे. अंगद बेदी आणि नेहा धुपिया यांनी एका मॅगेझीनसाठीही एकत्र फोटोशुट केले आहे.

पती अंगदपेक्षा नेहा धुपियाची फॅनफॉलोविंग सोशल मीडियावर खूप जास्त आहे. नेहाचे इन्स्टावरील फॉलोवर्स 3 मिलियन्सहून अधिक आहेत तर अंगदचे इन्स्टावरील फॉलोवर्स हे 3 लाखांहून अधिक आहे.