भारत-पाक तणाव : आज दिवसभरात काय घडले पहा TOP-12 घडामोडी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुलवामा जिल्ह्यात १४ फेब्रुवारी रोजी दहशतवाद्यांकडून भ्याड हल्ला करण्यात आला. यात आभारताचे ४५ जवान शहीद झाले. त्यानंतर या हल्ल्याच्या बदल्याची मागणी देशभरातून करण्यात येत होती. त्यानंतर भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त काश्मीर मधील अतिरेक्यांचे तळ उद्धवस्त केले. २६ फेब्रुवारीला पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला यात ३५० अतिरेकी ठार झाले. त्यानंतर सायंकाळी पाच वाजल्यानंतर पाककडून पूंछ सेक्ट्मध्ये LOC वर गोळीबार करण्यात आला.

त्यानंतर आज दिवसभरात ज्या काही घटना घडल्या त्यावर एक दृष्टीक्षेप टाकूया

१) पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन
पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. भारताकडून याचे जबरदस्त उत्तर देण्यात आले. प्रतीकात्मक कारवाईमध्ये भारताचे १० जवान जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र पाकिस्तानी मीडियाने अशी माहिती दिली आहे की, भारताने केलेल्या कारवाईत ६ पाक अधिकृत कश्मीर च्या नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

२) शोपियान यथे २ आतंकवाद्यांच्या खात्मा
जम्मू काश्मीर मधील शोपियान सेक्टर मध्ये आतंकवादी आणि सैनिकांच्या चकमकीत २ आतंकवादी मारले गेले. यात भारताच्या कोणाचेही नुकसान झाले नसल्याची माहिती आहे.

३) रक्षा मंत्र्यांची बैठक
रक्षा मंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्मी चीफ बिपीन रावत , चीफ ऑफ एयर स्टाफ एयर चीफ मार्शल बिरेंद्र सिंह धनोओ आणि चीफ एडमिरल सुनील लांबा यांची पडली. या बैठकीत सीमा सुरक्षाच्या बाबतीत चर्चा करण्यात आली.

४) सुषमानीती : चीनलाही केले आपलेसे
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला घेरत जगापुढे भारताची बाजू जगापुढे समर्थपणे मांडली. सर्जिकल स्ट्राईक-२ च्या दुसऱ्याच दिवशी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज चीन दौऱ्यावर गेल्या आहेत. चीनमध्ये १६ वी रशिया, भारत आणि चीन या देशांची (RIC) मंत्रीस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत भारताने पाकिस्‍तानचा खरा चेहरा आज पुन्हा आंतरराष्‍ट्रीय व्यासपीठावर उघडा पाडला.

५) भारतीय हददीत पाकची घुसखोरी
पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरच्या सीमारेषेवरील भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारतीय वायू सेनेने पाकिस्तानचा डाव उधळून लावला आहे. पाकिस्तानच्या विमानांची भारतीय हद्दीत घुसकोरी होताच, भारतीय विमानांनी हा हल्ला परतवून लावला. त्यामध्ये पाकिस्तानचे एक विमान नेस्तनाबूत करण्यात आले आहे. पाकिस्तानचे एफ 16 हे विमान कोसळले आहे.

६) बडगाम येथे चॉपर क्रॅश होण्याची खबर
जम्मू काश्मीरमधील बडगाम येथे एमआई-17 चॉपर क्रॅश झाल्याची खबर आली. त्यानंतर जम्मू -काश्मीर पोलिसांनी सांगितले की या ठिकाणी दोन मृतदेह सापडले आहेत. बडगामच्या एसएसपींनी सांगितले की, एयरफोर्स च्या या टेक्निकल चॉपर क्रॅश ची चौकशी करण्यात येईल त्यानंतर पाकच्या मीडियामध्ये सांगण्यात आले की ही विमान दुर्घटना म्हणजे पाक कडून करण्यात आलेला हल्ला आहे. त्यानंतर हे आधुकृतरित्या सांगण्यात आले की यात पाच काही संबंध नाही.

७) देशातील एअरपोर्ट बंद
भारत आणि पाकिस्तानने आपापल्या देशातील विमानतळांना हायअलर्ट देण्यात आला आहे. तर उत्तर भारतात दक्षतेचे आदेश देण्यात आले असून, लेह, जम्मू, श्रीनगर, पठाणकोट, अमृतसर, चंदिगड, देहराडून, सिमाला विमानतळ सर्वसामान्य प्रवाशांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आली होती. मात्र नंतर ही विमानसेवा चालू देखील करण्यात आली.

८) उच्च स्तरीय बैठक
सीमेवर चालू असलेल्या हालचालींनंतर राष्ट्रीय सुरक्षा सलाहकार अजित डोभाल यांनी बैठक बोलावून घेतली . त्यानंतर बैठकीत गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी एनएसए च्या शिवाय आरऐंडएडब्ल्यू चीफ, गृह सचिव यांच्यासोबत सिनिअर आधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली

९) सेनेला तयार राहण्याचे निर्देश
भारत आणि पाकिस्तानने आपापल्या देशातील विमानतळांना हायअलर्ट देण्यात आला आहे. वायुसेनेला देखील हायअलर्ट देण्यात आला आहे. सर्व कर्मचाऱ्यांची सुट्टी रद्द करण्यात आली आहे. वायू सेनेची विमाने सज्ज करण्यात आली आहेत.

१०) आपणही करू शकतो अमेरिकेसारखी कारवाई
लादेनला मारलं जातं तर काहीही शक्य नाही असं वक्तव्य केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केलं आहे. इतकेच नाही तर, अमेरिका घुसून मारू शकतं तर भारत का नाही असंही ते म्हणाले. भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये असणारे जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी अड्डे उध्वस्त करत जैशचे अनेक मोठे कमांडर तसेच मसूद अजहर याचे दोन भाऊ आणि मेहुणा यांचा खात्मा केला आहे. या मुद्द्याला धरून अरूण जेटलींनी हे विधान केलं आहे.

११) २७०० कोटींची शस्त्रे खरेदी करण्यासाठी तातडीची मंजूरी
भारतीय सेनेनही आक्रमक पवित्रा घेत पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्यासाठी सज्ज झाली आहे. भारतीय संरक्षण मंत्रालयाला २७०० कोटींच्या संरक्षण साहित्य खरेदी करण्यासाठी सरकारने तातडीने मंजूरी दिल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे. या शस्त्रांमध्ये पाणबुड्यांचाही समावेश आहे, असंही अरूण जेटलींनी सांगितलं आहे.

१२) भारताने गमावले मिग 21 ; पायलट अद्याप बेपत्ता
भारताच्या हवाई हल्ल्यानंतर आज (बुधवारी दि- 27) पाकिस्तानने भारताच्या हवाई हद्दीत 3 विमाने घुसवण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु भारताची वायु सेना अतिशय दक्ष असल्यानं भारताने पाकिस्तानचे विमान एफ 16 हे विमान पाडत त्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला.परंतु यावेळी भारताचे मिग 21 हे विमान भारताने गमावलं असल्याचं एअर व्हाईस मार्शल आर. जी.के.कपूर यांनी अधिकृतरीत्या घोषित केले आहे. याशिवाय आपला एक पायलट बेपत्ता असल्याचंही त्यांनी अधिकृतरीत्या सांगितलं आहे.