चांगला पाऊस पडावा म्हणून यांनी पहा काय केले…

बंगळूरु : वृत्तसंस्था – चांगला पाऊस पडावा अशी सर्वानाच अपेक्षा असते. म्हणून अनेक खेडोपाडी लोक देवाकडे चांगला पाऊस पडण्याच मागणं मागतात, तर गावात अनेक बायका पाऊस मागतानाही दिसतात. यावर्षी तर पाऊसच पडला नाही. त्यामुळे शेतीचे झालेले नुकसान आणि असह्य झालेला हा उकाडा कधी एकदा संपेल असे झाले आहे. त्यामुळे प्रत्येकजण पावसाची अतिशय आतुरतेने वाट पाहत आहे. त्यामुळे चांगला पाऊस पडावा. या आशेने बंगळुरू येथे एका मंदिरात काही पुजारी पाण्याच्या भांड्यात बसून पूजा करत असल्याचे चित्र समोर आले आहे.

हे पुजारी हालसुरु येथील सोमेश्वर मंदिरात पाण्याच्या भांड्यात बसून पूजा करत आहेत. त्यांच्या हातात असणाऱ्या मोबाईलमध्ये ते नेमके सेल्फी काढत आहेत कि, हवामानाचे अपडेट पाहत आहेत. याचा अंदाज काही बांधता येत नाही. अशाप्रकारे पाऊस लवकर यावा म्हणून अनेक जण पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आज ७ जून मान्सूनचा पहिला दिवस पण तोही कोरडाच गेला.

पुढच्या २४ तासात मान्सून केरळमध्ये धडकेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे आता प्रत्यक्षात पाऊस येई पर्यंत हवामानाच्या भरवशावर राहावे लागणार आहे. दरम्यान नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, मेघालय, पश्चिम बंगाल आणि केरळ येथे मुसळदार पावसाने मान्सूनचं आगमन होईल. असं भाकीत हवामान विभागाने केले आहे.