Ex-बॉयफ्रेंडला पाहून ‘सारा’ने लपवला चेहरा, ब्रेकअपनंतर दोन वर्षाने आले आमने-सामने

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची अभिनेत्री सारा अली खान ही सध्या चित्रपटापेक्षा तिच्या अफेअरसाठी जास्त चर्चेत आहे. साराने दोन चित्रपटात काम केले आहे. सोशल मिडियावर तिला सगळे तिच्या अफेअरबद्दल बोलत आहे. ‘कॉफी विथ करण’ मध्ये साराने कार्तिकसोबत डेट करण्याविषयी बोलली होती. त्यावेळी तिला पसंत करणाऱ्यांचे मन तुटले होते. पण ही गोष्ट फार कमी लोकांना माहित आहे की, चित्रपटसृष्टीत पाऊल टाकण्याआधी साराचा ब्रेकअप झाला होता.

एका मुलाखतीत सारा म्हणाली की, ‘मी फक्त वीर पहाडियाला डेट केले होते. वीर पूर्व गृहमंत्री सुशील कुमार शिंदे’ यांचा नातु आहे. आम्ही दोघांमध्ये मैत्रीचे नाते आहे. कोणतीच गोष्ट आमच्या नात्यामध्ये आली नाही. वीरने माझे मन कधीच तोडले नाही. आम्ही १ वर्षे सोबत राहिलो’.

२०१७ मध्ये यांचे ब्रेकअप झाले. आता २ वर्षानंतर हे दोघे समोरासमोर आले. एका वृत्तपत्रात छापून आले आहे की, ‘स्टूडेंट ऑफ द इयर टू की स्क्रीनिंग’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगला हे दोघे समोर आले. वीर हा अभिनेत्री अनन्या पांडेचा चांगला मित्र आहे. स्क्रिनिंगला सारा आणि वीर एकमेकांपासून खुप लांब बसले होते. दोघांनी एकमेकांना पाहिले पण बोलले नाही. चित्रपट संपल्यानंतर सारा लगेच निघून गेली. असे वाटले की सारा वीरमुळे लगेच निघून गेली. साराला वीरसोबत पुन्हा मैत्री करण्याची इच्छा दिसली नाही.