पुण्यात खळबळजनक घटना ! पाकिस्तानी ड्रामा पाहते म्हणून पत्नीवर कोयत्याने सपासप वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पाकिस्तानी ड्रामा पाहते म्हणून संतापलेल्या पतीने पत्नीवर कोयत्याने सपासप वार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास सॅलीस्बरी पार्क येथे घडली. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी पतीला अटक केली आहे. तर जखमी पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

नरगीस आसिफ नायब (वय. ४५ वर्षे, रा. सलीस्बरी पार्क) असे जखमी महिलेचे नाव आहे. आसिफ नायब (वय. ५० वर्षे, रा. सॅलीस्बरी पार्क) याला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे.

आसिफ नायब यांचा होर्डींग लावण्याचा व्यवसाय आहे. तर नरगीस या गृहिणी आहेत. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. ते सॅलीस्बरी पार्क येथे राहण्यास आहेत. नरगीस यांनी मुलगा आरिफला दुध आणण्यासाठी खाली पाठवले होते. त्याने येताना दुधाची पिशवी फोडली. त्यामुळे आसिफ व नरगीस यांच्यात भांडण झाले होते. त्यावेळी त्यांनी तिला शिवीगाळ करत धमकी दिली होती. तेव्हापासून ते एकमेकांशी बोलत नव्हते. दरम्यान सोमवारी दुपारी त्यांची मुलगी ट्यूशनला गेली होती. तर घरी काम करणारी महिला कामासाठी आली होती. त्यांनी सासू, काम करणारी बाई यांच्यासोबत जेवण केले. त्यानंतर सासूवरच्या मजल्यावर राहात असल्याने त्या घरी गेल्या. त्यानंतर काम करणारी बाई फरशी पुसत होती. तर पती आसिफ टि. व्ही. पाहात होते. त्यावेळी नरगीस बेडरुममध्ये जाऊन मोबाईलवर युट्यूबवर पाकिस्तानी ड्रामा पाहात होती.

तेवढ्यात आसिफ तेथे आले. त्यांनी हातात कोयता घेऊन आले. नरगीसला कोयता दाखवून तुला पाकिस्तानी ड्रामा पाहू नकोस म्हणून सांगितलेल कळत नाही का ? कालही माझ्याशी भांडण केले. असं म्हणत नरगीसच्या डोक्यावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. त्यांनी ते वार अडविण्यासाठी हात पुढे केला. तर हाताचा अंगठा तुटून खाली पडला. त्यानंतर नरगीस यांनी आरडाओरडा केला. तेव्हा शेजारच्या लोकांनी येऊन त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पोलिसांनी आसिफला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस आर. सी. उपनिरीक्षक उसगावकर करत आहेत.