76 मुलांची सुटका करणाऱ्या हेड कॉन्स्टेबल सीमा ढाकाला मिळाले ‘आउट-ऑफ-टर्न प्रमोशन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   देशाची राजधानी दिल्लीतील समयपूर बादली पोलीस स्टेशनमध्ये तैनात असलेल्या एका महिला हेड कॉन्स्टेबलला आउट ऑफ टर्न प्रमोशन देण्यात आले आहे. हेड कॉन्स्टेबलप्रती असलेले त्यांचे समर्पण आणि प्रामाणिकपणा लक्षात घेता उच्च अधिका-यांनी त्यांना आउट ऑफ टर्न पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला. महिला हेड कॉन्स्टेबल सीमा ढाकाने अडीच महिन्यांत 76 मुलांना शोधून काढले. यामुळे दिल्ली पोलिसांनी त्यांचे प्रमोशन करण्याचा निर्णय घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, सीमा ढाका यांनी सापडलेल्या 76 मुलांपैकी 56 मुले 14 वर्षांपेक्षा कमी वयाची आहेत.

दिल्ली पोलीस आयुक्त एन. एन. श्रीवास्तव यांनी सीमा ढाकाला आउट ऑफ टर्न प्रमोशनची घोषणा केली. त्यांना प्रोत्साहन योजनेंतर्गत पदोन्नती देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत सीमा आउट ऑफ टर्न प्रमोशन मिळविणारी दिल्ली पोलिसांची पहिली कर्मचारी ठरली आहे. सीमा यांच्या मते, त्याच्यासाठी सर्वांत आव्हानात्मक बाब म्हणजे यावर्षी ऑक्टोबरमध्ये पश्चिम बंगालहून एका अल्पवयीन मुलाची सुटका करणे. पोलिसांच्या पथकाने मुलाला शोधण्यासाठी बोटींमध्ये प्रवास केला आणि पूरदरम्यान दोन नद्या ओलांडल्या.

या राज्यांतून शोधली मुले

सीमा ढाका म्हणाल्या की, त्यांनी दिल्ली, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा आणि पंजाबमधील मुलांना वाचवले. त्या अनेक महिन्यांपासून अशा विषयांवर काम करत होत्या आणि म्हणाल्या की, तिच्या वरिष्ठांनी तिला अधिक प्रकरणे सोडविण्यासाठी आणि कुटुंबांना मदत करण्यासाठी प्रेरित केले. ढाका म्हणाल्या की, माझ्या वरिष्ठांनी आणि टीम सदस्यांनी मला ही पदोन्नती मिळविण्यात मदत केली. मी एक आई आहे आणि कोणीही आपल्या मुलास गमावू इच्छित नाही. आम्ही मुलांना वाचवण्यासाठी हरवलेल्या मुलांच्या अहवालावर दररोज चोवीस तास काम केले.

सर्वांत मोठे आव्हान

यावर्षी ऑक्टोबरमध्ये पश्चिम बंगालमधून अल्पवयीन मुलाची सुटका करणे ही त्यांच्यासाठी सर्वांत आव्हानात्मक बाब असल्याचे ढाका म्हणाल्या. पोलिसांच्या पथकाने मुलाला शोधण्यासाठी बोटींमध्ये प्रवास केला आणि पूरदरम्यान दोन नद्या ओलांडल्या. मुलाच्या आईने दोन वर्षांपूर्वी तक्रार दिली होती, परंतु नंतर त्यांनी आपला पत्ता आणि मोबाइल नंबर बदलला. आम्ही त्याचा शोध घेऊ शकलो नाही; पण तो पश्चिम बंगालचा आहे हे आम्हाला ठाऊक होते. शोधमोहीम सुरू करण्यात आली. आम्ही एका छोट्या गावात गेलो आणि पूरदरम्यान दोन नद्या पार केल्या. आम्ही कसं तरी मुलाला त्याच्या नातेवाईकांकडून सोडविण्यात यश आले.