‘कोरोना’च्या पार्श्वभुमीवर जुमाची नमाज मस्जिद मध्ये कमीत कमी वेळेत पठण करावी, पुण्यातील सीरत कमीटीचं सकारात्मक ‘आवाहन’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यासह राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव थांबविण्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकारनं उपाययोजना केल्या आहेत. पुण्यासह राज्यात संचारबंदी सदृश्य स्थिती आहे.

पुण्यातील सीरत कमिटीनं देखील कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी एक चांगलं पाऊल उचचलं आहे. पुण्यातील सीरत कमिटीनं जुमाची नमाज मस्जिद मध्ये कमीत कमी वेळेत पठण करण्याबाबत सकारात्मक आवाहन केलं आहे. सीरत कमिटीनं केलेलं हे सकारात्मक आवाहन आहे.
letter