शिक्षक दिन : 8 KM चालत जात प्राथमिक शाळेत शिकविणारी शिक्षिका बनली IAS ऑफिसर

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  आज देशभरात शिक्षक दिन साजरा केला जात आहे. शिक्षक हे आपल्या आयुष्याला कलाटणी देण्यात महत्वाची भूमिका बजावतात. विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी ते कठोर परिश्रम घेतात. उत्तर प्रदेशात अश्याच एक शिक्षिका आहेत, ज्यांनी कठोर परिश्रम घेत यूपीएससी परीक्षाही उत्तीर्ण केली. प्राथमिक शाळेची शिक्षिका सीरत फातिमाने शाळेत शिकवताना परिश्रम व तयारीने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. 2017 च्या निकालामध्ये 990 उमेदवारांचा समावेश होता, त्यापैकी 810 वे नाव सीरत फातिमाचे होते. सध्या फातिमा भारतीय आणि वाहतूक सेवेत कार्यरत आहेत. ती उत्तर प्रदेशच्या अलाहाबादमधील करेली भागातील रहिवासी आहे, तिने आपल्या कारकीर्दीची सुरुवात शिक्षिका म्ह्णून केली.

सीरतचे वडील अब्दुल गनी सिद्दीकी हे सरकारी कार्यालयात लेखापाल म्हणून कार्यरत आहेत. जेव्हा सीरत 4 वर्षांची होती तेव्हा वडिलांचा असा विचार होता की एक दिवस त्यांची मुलगी आयएएस होईल. सीरत ही त्यांची मोठी मुलगी आहे. 2017 मध्ये जेव्हा निकाल आला तेव्हा तिचे वडील मुलीच्या यशावर सर्वात जास्त खूष झाले. आपल्या मुलीच्या शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी त्यांनी सीरतला सेंट मेरी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये प्रवेश घेऊन दिला. घर चालविण्यासाठी पुरेसे पैसे नसताना तिच्या वडिलांनी सीरतला प्रवेश घेऊन दिला. बारावी पूर्ण झाल्यानंतर सीरत फातिमाने अलाहाबाद सेंट्रल युनिव्हर्सिटी मधून बी.एस्सी आणि बीएड डिग्री घेतली, त्यानंतर तिने प्राथमिक शाळेत मुलांना शिकवायला सुरुवात केली. तिने म्हंटले कि, “मी शिक्षक म्हणून काम करण्यास सुरुवात केली कारण माझ्या वडिलांच्या पगारात घर चालविणे अवघड होते.”

त्यानंतर तिने घरापासून 38 किमी अंतरावर शाळेत शिकविण्यास सुरुवात केली. शाळेत जाण्यासाठी तिला प्रथम बसने 30 कि.मी., त्यानंतर 8 किमी चालत जावे लागायचे. त्यांच्या प्रशिक्षणादरम्यान, त्यांनी यूपीएससी (युनियन लोक सेवा आयोग) चे स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा व्यक्त केली. नोकरीच्या काळात तिला कमी वेळ मिळायचा. अशा परिस्थितीत शाळेतून आल्यानंतर ती उर्वरित वेळ घरी अभ्यास करायची. तिने तीन वेळा यूपीएससी परीक्षा दिली, ज्यामध्ये त्याची निवड होऊ शकली नाही. सतत अपयशामुळे तिच्यावर खूप मानसिक तणाव होता. पण तरीही तिने हार मानली नाही. सलग तिसर्‍या अपयशानंतर कुटुंबाकडून तिच्यावर दबाव आणला जात होता, कुटुंबाच्या दबावामुळे त्यांना लग्नाला होकार द्यावा लागला.

लग्नानंतर तिची जबाबदारी आणखीनच वाढली. घरगुती जबाबदाऱ्या सांभाळून काम करणे आणि त्यानंतर यूपीएससीची तयारी करणे तिला सोपे नव्हते. परीक्षेची तयारी करत असताना ती पूर्णपणे निराश झाली होती आणि तिला हार मानण्याची इच्छा होती, परंतु यादरम्यान तिने या संकटाच्या काळात नवाजुद्दीन सिद्दीकीचा मांझी – द माउंटनमॅन चित्रपट पाहिला. ती म्हणते की या चित्रपटाने मला नव्याने सुरुवात करण्याची स्पुर्ती दिली आणि त्याचा परिणाम आपल्या सर्वांसमोर आहे.

2016 मध्ये केवळ सहा क्रमांकाने तिचा नंबर गेला, त्यानंतर प्रिलिम्स परीक्षेत तिला यश मिळाले. प्रिलिम्स मध्ये यश मिळविल्यानंतर तिने मेन्सची तयारी केली. ती छोट्य छोट्या नोट्स बनवून वाचत असे. ती घरी लिहून तयारी करायची. अधिकाधिक लिहिण्याची सवय लावली. अशा प्रकारे, तिने चौथ्या प्रयत्नात मेन्समध्ये यश संपादन केले. तिच्या या यशामुळे वडिलांना खूप आनंद झाला. लग्नाच्या तीन महिन्यांनंतर तिने यूपीएससी मेन्सची परीक्षा दिली.