चहलच्या साखरपुड्यावर सेहवागने घेतली फिरकी, म्हणाला – ‘वाह ! आपत्तीला संधीमध्ये बदलले’

पोलीसनामा ऑनलाईन : भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहलचा साखरपुडा झाला आहे. त्याने आपली जोडीदार धनश्री वर्माशी साखरपुडा केला. चहलने आपल्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताच त्यांचे अभिनंदन करणार्‍यांची एकच गर्दी जमली. पण या सर्वांच्या दरम्यान माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने चुटकी घेतली. दरम्यान, ट्विटरवर धनश्री वर्मासोबत फोटो पोस्ट करतांना युजवेंद्र चहलने कॅप्शनमध्ये लिहिले कि, ‘आम्ही आमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये हो म्हणालो’, त्यासोबतच त्याने हॅशटॅग रोका सेरेमनी असे देखील लिहिले आहे. वीरेंद्र सेहवागने ट्विटरवर चहलच्या पोस्टला उत्तर देताना लिहिले, “वाह चहल, आपत्तीला संधीमध्ये बदलले. अभिनंदन !’

याशिवाय टीम इंडियाच्या इतर खेळाडूंनीही चहलचे अभिनंदन केले. केएल राहुलपासून ते हार्दिक पांड्यापर्यंत सर्वानी चहलला शुभेच्छा दिल्या. भारतीय कर्णधार विराट कोहलीनेही युजवेंद्र चहलचे अभिनंदन केले आहे. टीम इंडियाचा लेग स्पिनर आणि आपल्या मजेशीर शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या युजवेंद्र चहलने साखरपुडा करून आपल्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे.

कोण आहे धनश्री वर्माः
धनश्री वर्मा ही डॉक्टर, कोरिओग्राफर आणि यू ट्यूबर आहेत. स्वत: युजवेंद्र चहल सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतात. साखपुड्या आधी चहल धनश्री वर्मासोबत बर्‍याच झूम सत्रांमध्ये सक्रिय दिसला होता. युजवेंद्र चहल आयपीएलमध्ये आरसीबीच्या टीमचा भाग आहे. लॉकडाऊन दरम्यान चहल सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव होता. यावेळी त्याने अनेक व्हिडिओही पोस्ट केले आहेत.

दरम्यान, युजवेंद्र चहलने आतापर्यंत 52 एकदिवसीय सामने आणि 42 टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहे. लेगस्पिनर चहल टी – 20 स्वरूपात भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू आहे. त्याच्या नावावर 55 टी 20 आंतरराष्ट्रीय विकेट आहेत. चहल सध्या कोरोनामुळे क्रिकेटपासून ब्रेकवर आहे. दरम्यान, त्याने आयपीएल 2020 चे प्रशिक्षण सुरू केले आहे.