सहाय्यक निरीक्षक वाझेकडे 12 गाडया असल्याचा NIA ला संशय, पुण्याच्या फॉरेन्सिककडून वाहनांची तपासणी

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेरील स्फोटके असलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणात सचिन वाझेंना अटक करण्यात आली आहे.आता पर्यंत एनआयएच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार वाझेंचा सहभाग स्पष्ट होत आहे. एनआयएने वाझे वापरत असलेली तीन वाहने जप्त केली असून शुक्रवारी पुण्याच्या फॉरेन्सिक टीम कडून या वाहनांची तपासणी केली जात आहे. त्यामुळे वाझे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दरम्यान एनआयएला आणखी काही पुरावे मिळाले आहेत. दरम्यान, वाझेंकडे एक-दोन नाही तर १२ वाहने असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

पुणे फॉरेन्सिक टीम मुंबईत दाखल झाली आहे.जप्त केलेल्या दोन वाहनांची तपासणी करण्यात आली. आतापर्यंत एनआयएने या प्रकरणात २५ फेब्रुवारी रोजी वापरण्यात आलेल्या स्कॉर्पिओ, इनोव्हा त्यानंतर वाझे वापरत असलेल्या २ मर्सिडीज बेंज, लँड क्रूझर अशा पाच गाड्या जप्त करण्यात आल्या आहे. या सर्व वाहनांची फॉरेन्सिक चाचणी करण्यात येणार आहे.

वाझेकडे १२ गाड्या असल्याचा संशय
सचिन वाझे हे तीन कंपन्यांमध्ये भागीदार किंवा गुंतवणूकदार असल्याचे समोर येत आहे. त्याच बरोबर त्यांच्याकडे १२ वाहने असल्याचे स्पष्ट होत आहे मात्र हि वाहने या वाझेंच्या नावावर नाहीत. दरम्यान अन्य वाहनांची माहिती मिळताच तीही जप्त करण्यात येणार असल्याचे एनआयएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.