तब्बल ८ हजार किलो शार्क माशांच्या कल्ल्यांची तस्करी करणारे गजाआड

मुंबई : वृत्तसंस्था

महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) मुंबई आणि गुजरातमधून ८००० किलो शार्क माशाचे कल्ले जप्त केले आहेत. या कारवाईदरम्यान तस्करीची मोठी साखळी उद्ध्वस्त करत डीआरआयने तस्करांच्याही मुसक्या आवळल्या आहेत. हस्तगत करण्यात आलेल्या ८००० किलो कल्ल्यांपैकी ३००० किलो कल्ले मुंबईतील शिवडी येथील गोदामातून, तर उर्वरित ५००० किलो कल्ले गुजरातमधील वेरावल येथून जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईत एकूण ४ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत डीआरआयने दिलेल्या माहितीनुसार, हे ८००० किलो कल्ले चीन आणि हाँगकाँगला निर्यात करण्यात येत होते.
[amazon_link asins=’B00O45B0HO,B0002E3MP4′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’26453a38-af9c-11e8-853a-e3adff17fe32′]
या शार्क फिन्सची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 35 ते 40 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान हे मासे असल्याचं सांगून त्यांचे अवयव निर्यात केले जायचे. चीन आणि जपानसारख्या पूर्वेकडील देशांमध्ये शार्क माशांना मोठी मागणी आहे. शार्क माशांच्या शिकारीवर जगभरात बंदी आहे. आणि त्यामुळे हे अवयव मिळवण्यासाठी आधी त्यांचे फिन्स कापून त्यांना समुद्रात सोडलं जात होतं. त्यामुळे कालांतराने त्यांचा मृत्यू होत होता.

जाहिरात

शार्क माशाच्या कल्ल्यांचा सूप तयार करण्यासाठी वापर केला जातो. चीन आणि व्हिएतनाममध्ये शार्क फिन सूपला मोठी मागणी आहे. चीन आणि व्हिएतनाममध्ये लग्न समारंभ, तसेच मोठ्या कार्यक्रमांमधील जेवणामध्ये या सूपचा वापर केला जातो. शार्क फिन सूप हे अतिशय महागडे खाद्य मानले जाते. एक बाउल फिन सूपची किंमत साडे आठ हजार रुपये इतके आहे.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी

जाहिरात