‘स्वीकृत’च्या निवडीअगोदरच स्थायी, महिला-बालकल्याण समितीचे सदस्य निवडले

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – अहमदनगर महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी करण्याअगोदरच सर्वसाधारण सभा घेऊन स्थायी समिती व महिला बालकल्याण समिती यांच्या निवडी करण्यात आल्या. आज दुपारी या निवडी झाल्या. या सभेला शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी हरकत घेतली होती.

स्थायी समिती सदस्य म्हणून निवड झालेले नगरसेवक
भाजप : आशा कराळे, सोनाली चितळे, मनोज कोतकर,
राष्ट्रवादी काँग्रेस: अविनाश घुले, गणेश भोसले, दीपाली बारस्कर, कुमार वाकळे, शोभा बोरकर
शिवसेना : योगीराज गाडे, गणेश कवडे, सुभाष लोंढे, अमोल येवले, सुवर्णा जाधव, विद्या खैरे
काँग्रेस : संध्या पवार
बसपा : मुदस्सर शेख

महिला-बालकल्याण समिती सदस्य म्हणून निवड झालेले नगरसेवक
भाजप : लता शेळके, गौरी नन्नावरे, सोनाबाई शिंदे
राष्ट्रवादी काँग्रेस : ज्योती गाडे, मीना चव्हाण, परवीन कुरेशी, मीना चोपडा, शोभा बोरकर
शिवसेना : सुवर्णा गेनप्पा, रिता भाकरे, कमल सप्रे, पुष्पा बोरुडे, सुनीता कोतकर, सुनीता लोखंडे
काँग्रेस : रिझवाना शेख
बसपा : अनिता पंजाबी