Pune News : ‘आयसर’च्या 3 शास्त्रज्ञांची फेलो म्हणून निवड !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (आयसर) तीन शास्त्रज्ञांची बंगळूर येथी भारतीय विज्ञान अकादमीचे फेलो (संस्थेचे मान सदस्य) म्हणून निवड झाली आहे. जीवशास्त्राचे प्रा. अंजन बॅनर्जी आणि डॉ. थॉमस पुकाडील, भौतिकशास्त्राच्या प्राध्यापक डॉ. सीमा शर्मा आदींच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना ही फेलोशिप देण्यात आली आहे. तसेच प्रा. बॅनर्जी यांची राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे फेलो म्हणूनही निवड झाली आहे. प्रामुख्याने वर्षभरासाठी ही निवड झाली आहे.

फेलो म्हणूून निवड झालेल्या शास्ज्ञज्ञांच्या संशोधनाचा प्रमुख भाग पुढील प्रमाणे :
प्रा. बॅनर्जी – यांच्या कार्य़शाळेत प्रामुख्याने बटाट्याच्या वाढीमध्ये भूमिका बजावणाऱ्या जैविक रेणूंच्या नियंत्रणासंबंधी संशोधन चालू आहे. आधुनिक जैवतंत्रज्ञान, जैवमाहितीशास्त्र आदींच्या साहाय्याने हे संशोधन होते.

डॉ. शर्मा – विश्‍वाच्या मूलभूत रचना समजून घेण्यासाठी डॉ. शर्मा यांची प्रयोगशाळा मूलभूत कणांवर संशोधन करत आहे. प्रोटॉन-प्रोटॉन धडकेचा अभ्यास या प्रयोगशाळेत होतो. नव्या मूलभूत कण आणि त्यांच्यातील अभिक्रिये संदर्भातील सैद्धांतिक मांडणी अर्थात सुपरसीमेट्रीसंबंधीचे संशोधन, कॉस्मिक ऑब्झर्वेशन संबंधीचे संशोधन या कार्य़शाळेत होते.

डॉ. पुकाडील – पेशीद्रव्यातील मेंम्बरेनच्या विभाजनासंबंधीचे संशोधन डॉ. पुकाडील यांच्या प्रयोगशाळेत चालते. पेशीमध्ये विविध क्रियांसाठी मेंम्ब्रेनची निर्मिती होते. या मेंम्ब्रेनसंबंधीच्या प्रथिनांच्या संशोधनात ही प्रयोगशाळा कार्यरत असल्याचे सांगण्यात आले आहे.