धोनी विंडीज दौऱ्यावर गेला नाही तर ‘या’ युवा खेळाडूसाठी फार मोठी संधी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप नंतर नंतर भारताचा यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनी याच्या निवृत्तीच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. संघ व्यवस्थापनाने याविषयी धोनीशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र विंडीज दौऱ्यासाठी धोनीची निवड होणे कठीण आहे. यामुळे आता निवड समितीकडे धोनीचा उत्तराधिकारी शोधण्याची चांगली संधी आहे. त्यामुळे निवड समिती या दौऱ्यासाठी युवा रिषभ पंत याची निवड करण्याची शक्यता आहे. काही जाणकारांनी मत व्यक्त केले आहे कि, धोनीला वर्ल्डकपनंतर संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. तर काहीजण धोनीचे समर्थन करत असून त्याने संघात राहून युवा खेळाडूंना मार्गदर्शन करावे. त्याचबरोबर २०२३ च्या वर्ल्डकपच्या दृष्टीने रिषभ पंत आणि संजू सॅमसन सारख्या युवा खेळाडूंना संधी देणे गरजेचे आहे.

न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सेमीफायनल सामन्यात चुकीच्या पद्धतीने बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली याने त्याचे समर्थन केले होते. त्याने म्हटले होते कि, तो प्रतिभावान खेळाडू आहे. मी देखील माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अशा चुका केल्या होत्या. त्यामुळे त्याच्याकडे सुधारणा करण्यासाठी संधी आहे. त्याचबरोबर पुढे बोलताना कर्णधार कोहली म्हणाला कि, सर्वच खेळाडूंना आपल्या देशासाठी खेळण्याचा अभिमान आहे. त्याचबरोबर चुकांमधून तो नवीन गोष्टी शिकून बाहेर येईल.

दरम्यान, युवा खेळाडूंना संघात देण्याच्या दृष्टीने हा विंडीज दौरा खूप उत्तम पर्याय आहे. त्यामुळे रिषभ पंतसारख्या खेळाडूंना संधी देऊन त्यांना आजमावून पाहणे फार महत्वाचे आहे. यष्टीरक्षक फलंदाजांसाठी हा दौरा फार महत्वाचा असून या दौऱ्यात उत्तम कामगिरी करून धोनीच्या जागेसाठी तो दावेदारी सांगू शकतात.

आरोग्यविषयक वृत्त