काय सांगता ! होय, रिझर्व्ह बँक ऑफ कैलास अन् संस्थापक स्वामी नित्यानंद, उद्घाटन गणेश चतुर्थीच्या दिवशी (Video)

पोलिसनामा ऑनलाईन टीम स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आणि बलात्कार प्रकरणातील आरोपी असलेला स्वामी नित्यानंद पुन्हा एकदा चर्चेत आले आहेते. ‘कैलास’ नावाचे स्वतंत्र हिंदूराष्ट्र स्थापन केल्याचा दावा करणार्‍या नित्यानंदने आता या कथित राष्ट्राच्या शिखर बँकेची स्थापनाही केली आहे. या बँकेचे त्यांनी ‘रिझर्व्ह बँक ऑफ कैलास’ असे नामकरणही केले आहे. गणेश चतुर्थीला या बँकेचे चलनही घोषित करणार आहे. यासंदर्भात नित्यानंदचा स्वतः माहिती देणारा एक व्हिडिओ समोर आला आहे.


स्वामी नित्यानंदवर लहान मुलांना डांबून ठेवण्यासह इतर बलात्काराचे आरोप आहेत. त्याने 50 न्यायालयीन सुनावण्याही चुकवल्या आहेत. भारतातून तो फरार झाला असून इंटरपोलने त्याला ब्ल्यू कॉर्नर नोटीसही बाजवली आहे. मात्र, अद्यापही तो मुक्तपणे वावरत असून भविष्यातील विविध योजना आखत आहे.

बलात्कार प्रकरणाची अहमदाबादमधील नित्यानंदबाबतची सुनावणी कोरोना संकटामुळे थांबवण्यात आली होती. नित्यानंदने अमेरिकेतील एका बेटावर स्थापन केलेल्या ‘कैलास’ या देशाच्या बँकेची स्थापना केली आहे. गणेश चतुर्थीला आम्ही ‘रिझर्व्ह बँक ऑफ कैलास’ आणि त्याच्या चलनासंबंधी सर्व माहिती जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.