सेल्फी काढताना महाबळेश्वर मध्ये पर्यटक दरीत कोसळला 

महाबळेश्वर : पोलीसनामा ऑनलाईन – मोबाईलवर बोलत असताना किंवा सेल्फी घेत असताना अनेक पर्यटकांचा अपघात घडल्याच्या अनेक घटना आहेत. अशा अनेक घटना घडल्या तरी अजून देखील लोक त्यातून बोध घेताना दिसत नाहीत. आता अशीच एक घटना महाबळेश्वर येथे घडली असून सेल्फी काढताना पर्यटक दरीत कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.

थंडीचा मोसम सुरू असल्याने महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. याच दरम्यान पर्यटनासाठी आलेला  एक पर्य़टक लॉडविक पाईंटवर सेल्फी घेत असताना दरीत कोसळला. यानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली. याची माहिती मिळताच ट्रेकर्स घटनास्थळी दाखल झाले असून पर्यटकाचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या कोसळल्या पर्यटकाबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.