कंपनीचा फॉर्म्युला विकून झाले मालामाल

औरंगाबाद : पोलीसनामा आॅनलाईन

कंपनीत काही वर्षे काम केल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला़ त्यानंतर काही काळाने कंपनीला आपल्यासारखेच हुबेहुब उत्पादन तुकस्थानच्या कंपनीने बाजारात आणल्याचे दिसून आले. अधिक चौकशी केल्यावर कंपनीचा राजीनामा देऊन गेलेले दिलीप लोके, सुरेश कुलकर्णी आणि विलास शिंदे हे त्या तुर्कस्थानी कंपनीशी निगडीत असल्याचे समजले. तुकस्थानहून मुंबईत आलेल्या दिलीप लोके याला पोलिसांनी मुंबई विमानतळावर अटक केली असून तिच्या दोघे साथीदार फरार आहेत़ कंपनीचे तंत्रज्ञान परदेशी कंपनीला विकून ते मालामाल झाले, पण भारतीय कंपनीला त्यामुळे जगभरात स्पर्धा निर्माण झाल्याचे त्याचा कितीतरी मोठा फटका बसला आहे.

वाळूज औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीच्या बाबतीत हा प्रकार घडला़ दिलीप लोके (६५, रा. सिडको), सुरेश हरिभाऊ शिंदे आणि विलास किसनराव शिंदे अशी या तीन माजी कर्मचाºयांची नावे आहेत. वाळुज एमआयडीसीमधील एका नामांकित कंपनीमध्ये ते उच्च पदावर कार्यरत होते. कंपनीचे तंत्रज्ञान सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांनी २०१२ मध्ये कंपनीचा राजीनामा दिला. त्यानंतर ते तुर्कस्थानला गेले. त्यापूर्वी त्यांनी कंपनीच्या उत्पादनाचे तंत्रज्ञान, फॉर्म्युला चोरुन नेला होता. हे तंत्रज्ञान त्यांनी तेथील एका कंपनीला विकले. त्या आधारे या कंपनीने उत्पादन करण्यास सुरुवात केली़ आपल्यासारखेच उत्पादन तुर्कस्थानच्या कंपनीने बाजारात आणल्यानंतर ही बाब औरंगाबादेतील कंपनीच्या मालकाला समजली़ त्यांनी चौकशी केल्यावर आपल्याकडीलच राजीनामा देऊन गेलेल्या तिघांनी हे तंत्रज्ञान त्या कंपनीला पुरविल्याचे त्यांच्या लक्षात आले. डिसेंबर २०१७ मध्ये त्यांनी पोलिसांकडे गुन्हा दाखल केला. त्याचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता.

पोलिसांनी आरोपींचा शोध घेतल्यावर ते परदेशात असल्याची माहिती मिळाली़ त्यांची सूचना पोलिसांनी विमानतळावरही सूचना दिली होती. दिलीप लोके हा तुर्कस्थानातून विमानाने मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आल्यावर तेथील अधिकाºयांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर औरंगाबाद पोलिसांनी तेथे जाऊन त्याला अटक केली आहे.