home page top 1

पुण्यात ब्रँडेड कंपनीच्या बनवाट वस्तू विकणाऱ्या टोळीचा ‘पर्दाफाश’, व्यापारी अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भारतातील नामांकित कंपनीचे घरगुती वापराचे ब्रँडच्या नावाखाली बनावट वस्तू विकणाऱ्या व्यापाऱ्यांच्या टोळीला गुन्हे शाखा युनिट – 3 च्या पोलिसांनी अटक केली आहे. ब्रँडेच्या नावाखाली बनावट हँडवॉश, रुमप्रेशनर, टॉयलेट क्लिनरची विक्री करून ग्राहक व शासनाची फसवणुक करणाऱ्या व्यापाऱ्यांना अटक करून 16 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई कात्रज-कोंढवा रोडवरील गोकुळ नगर येथे करण्यात आली.

Harpic

देशातील ब्रँडेड कंपन्यांचा लोगोंचा गैरवापर करून बनावट वस्तू बाजारात विक्री होत असून या वस्तू गोकुळ नगर येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये तयार करण्यात येत असल्याची माहिती पोलीस कर्मचारी संतोष क्षीरसागर व अतुल साठे यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी पथकाला भारतातील नामांकीत कंपन्यांचे उत्पादन असणारे टॉयलेट क्लिनर, डिश वॉश, फलोअर क्लिनर, ग्लास क्लिनर या वस्तूसारख्या हुबेहेब बनावट निकृष्ट दर्जाच्या वस्तू आढळून आल्या. या वस्तून भारतातील नामांकीत कंपनीचे लेबल लावून त्याची पुणे शहर आणि इतर ठिकाणी विक्री केली जात होती. ग्राहकांची फसवणूक करून शासनाची फसवणूक करत असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी पोलिसांनी हितेश रावरिया (वय-48 रा. जेएसपीएम कॅपस, नऱ्हे) याला अटक केली आहे. तर त्याचा मालक रामजी महादेव पटेल (वय-42) आणि त्याचे साथिदार फरार झाले आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Dettol

पोलिसांनी मारलेल्या छाप्यामध्ये व्हिल डिटर्जंट पावडर, फेअर अ‍ॅड लव्हली क्रिम, हार्पिक लिक्विड, लायझॉल, विको टर्मरिक क्रिम, पॅराशुट ऑईल, विम, डेटॉल हँडवॉश, कोलीन फलोअर क्लिनर, ओडोनिल एअर फ्रेशनर, डायव्हर्सी या नामांकीत कंपनीची बानावट तयार केलेल्या मालाचा साठा जप्त करण्यात आला. तसेच वेगवेगळ्या कंपन्यांचे स्टिकर, कच्चा माल असा एकूण 16 लाख चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Wheel

अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला 30 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे बच्चन सिंग, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट -3 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे, पोलीस उप निरीक्षक संजय गायकवाड, किरण अडागळे, पोलीस कर्मचारी संतोष क्षीरसागर, अतुल साठे, दत्तात्रय गरुड, प्रविण तापकीर, संदिप तळेकर, शकील शेख, मच्छिंद्र वाळके, गजानन एकबोटे, दत्तात्रय गरुड, सुजित पवार यांच्या पथकाने केली.

Visit – policenama.com 

Loading...
You might also like