युतीच्या ‘त्या’ नव्या धोरणामुळे काही जणांच्या उमेदवारीला कात्री ? 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहिर झाल्या आहेत. त्यामुळे आता राजकीय पक्षांमधील हालचालींना वेग आला आहे. भाजप शिवसेना युतीनंतर पक्षश्रेष्ठींमध्ये तर दिलजमाई झाली पण युतीतल्या काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना युती अजूनही पचनी पडेना. याचाच फटका आगामी निवडणुकांत बसू नये याकरिता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार निवडणुकीच्या कालावधीत शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यातील समन्वय अधिक दृढ होण्याच्या दृष्टीने दोन्ही पक्षांचे पदाधिकारी जाहीर करण्यात आले आहेत. याबाबतची माहिती शिवसेनेचे मुखपत्र सामना मधून देण्यात आली आहे. त्यामध्ये जाहीर झालेल्या यादीनुसार पुण्यातील अनेक जणांच्या उमेदवारीला कात्री लागणार की काय अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा – #Loksabha : गिरीश बापट यांच्या पुण्यातील उमेदवारीबाबत उलट-सुलट चर्चा 

संपूर्ण महाराष्ट्रातील मतदार संघांमध्ये कोणाकोणावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे याची माहिती देखील सामनामधून देण्यात आली आहे. पुणे आणि आसपासच्या मतदारसंघांचा विचार करता, पुणे, बारामती, शिरूर, सोलपूर, माढा, मावळ (रायगडमधील तीन विधानसभा वगळून) या लोकसभा मतदार संघांची भाजप -सेना समन्वय अधिक दृढ करण्याची जबाबदारी भाजपकडून पालकमंत्री  गिरीश बापट यांना देण्यात आली आहे. तर शिवसेनेकडून डॉ. नीलम गोऱ्हे यांना देण्यात आली आहे.

हेही वाचा -एखादा व्यक्ती पक्ष सोडून गेल्याने पक्ष संपत नाही : शरद पवार

आता खुद्द गिरीश बापट यांची निवड दोन्ही पक्षातील समन्वय अधिक दृढ होण्याच्या दृष्टीने करण्यात आली असेल तर मग त्यांच्या उमदवारीचे काय ? की पुण्यातून उमेदवारी आणि समन्वयाचे काम दोन्ही पालकमंत्र्यांनाच करावे लागेल ? की त्यांना उमेदवारी देण्यात येणार नाही ? याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. इतकेच नाही तर पालकमंत्र्यांच्या उमेदवारीबाबत देखील उलट-सुलट चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. त्यामुळे काही जणांच्या उमेदवारीला कात्री लागणार असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मसूदला दिली होती क्लिन चीट : काॅंग्रेस

You might also like