अमेरिकेमधून चीनी कंपन्याना बाहेर काढण्यासाठी US एक्सचेंज डिलिस्ट बील सीनेटकडून मंजूर

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – कोविड-19 महामारीवरून नाराज झालेल्या अमेरिकेने आता चीनवर चारही बाजूने दबाव आणण्यास सुरूवात केली आहे. आर्थिक मोर्चावर अमेरिका चीनला लागोपाठ झटके देत आहे. याचाच भाग म्हणून अमेरिकन सीनेटने चीनी कंपन्यांना अमेरिकन शेयर बाजारातून डिलिस्ट करण्यासाठी बुधवारी एक बिल पास केले आहे. विशेष म्हणजे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगात कोरोना व्हायरस पसरण्यास चीनला जबाबदार धरले आहे. मीडिया रिपोर्टनुसार अमेरिकन सीनेटकडून मंजूर झालेला कायदा काही चीनी कंपन्यांना अमेरिकी एक्सचेंमध्ये आपले शेयर सूचीबद्ध करण्यास प्रतिबंध करू शकतो, जोपर्यंत ते अमेरिकन ऑडिट आणि नियमांचे पालन करत नाहीत. रिपब्लिकन सीनेटर जॉन केनेडी आणि डेमोक्रेटिक सीनेटर क्रिस वॉन होलेन यांनी सादर केलेले हे बिल सर्वसंमतीने मंजूर करण्यात आले

परंतु, हे बिल प्रतिनिधी सभेला मंजूर करावे लागेल आणि कायदा बनण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे हस्ताक्षर झाले पाहिजे. एका रिपोर्टनुसार, सुमारे 800 चीनी कंपन्या अमेरिकन शेयर बाजारात लिस्टेड आहेत. अमेरिकेच्या या निर्णयाने अलीबाबा आणि बायडू सारख्या मोठ्या चीनी कंपन्यांना झटका बसू शकतो. अमेरिकेचे हे पाऊल जगभरातील शेयर बाजारासाठी वाईट ठरू शकते. याशिवाय अनेक मोठे अमेरिकन गुंतवणूकदार चीनी कंपन्यांचे गुंतवणूकदार आहेत, त्यांनाही मोठा धक्का बसू शकतो.

ट्रम्प लागोपाठ चीनवर कोरोनाचे खापर फोडत आहेत आणि धडा शिकवण्याचा इशाराही देत आहेत. याअंतर्गतच अमेरिका चीनविरोधात एका पाठोपाठ एक चीन निर्णय घेत आहे. आता चीनी कंपन्यांना अमेरिकन शेयर बाजारातून डिलिस्टिंग करण्यासाठी अमेरिकन सीनेटमध्ये हे बिल पास करण्यात आले आहे. मात्र, हे लागू करण्यासाठी अजून काही कायदेशीर डावपेच बाकी आहेत. अमेरिकेच्या या पावलाने अमेरिकन शेयर बाजारात लिस्टेड चायनीज कंपन्या अडचणीत येऊ शकतात.