भारताचा पाकला इशारा : अभिनंदनला कोणत्याही अटींशिवाय भारतात पाठवा 

नवी दिलली : वृत्तसंस्था – भारतीय वायुसेनचे विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तानने ताब्यात घेतले आहे. पाकिस्तान भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहे. पण विंग कमांडर वर कोणतीही चर्चा किंवा करार होणार नाही असे सूत्रांकडून  स्पष्ट करण्यात आले आहे.भारताला कोणत्याही परिस्थितीत विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेची लवकरात लवकर अपेक्षा आहे. वैमानिकाच्या सुटकेसाठी कोणत्याही कराराचा प्रश्नच येत नाही. पाकिस्तानला जर असे वाटत असेल की काही तडजोड केली जाईल तर ती त्यांची चूक आहे. विंग कमांडर अभिनंदनला माणुसकीच्या नात्याने वागणूक देण्यात यावी अशी अपेक्षा भारताने केली आहे. यासंदर्भांतली माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
https://twitter.com/ANI/status/1101045807921483776
यावेळी भारताने स्पष्ट केले आहे की , भारताने कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला किंवा लष्कराला लक्ष्य केले नाही पण पाकिस्तानने मात्र भारतीय लष्करी प्रतिष्ठानांना लक्ष्य केले आहे. भारताने मुद्दामून LOC ओलांडलेली नाही. भारताने पाकिस्तानच्या युद्धनीतीच्या प्रयत्नांना फटका दिला आहे.
https://twitter.com/ANI/status/1101045488625901571
बुधवारी पाकिस्तानकडून घुसखोरी करण्यात आलेला F-16 या विमानाला परतवून लावताना भारतीय वायुसनकडून विमानांनी उड्डाण भरले होते. यात मिग -२१ या विमानाचा सामावेश होता. एकूण तीन विमानांपैकी एक विमान भारतात परतले नाही. हे विमान पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन पडले. या विमानात भारतीय वायुसेनचे विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तानने ताब्यात घेतले आहे. अभिनंदन यांचे व्हिडीओ,फोटो पाकिस्तानकडून व्हायरल करण्यात आले आहेत. भारताने जिनिव्हा करारानुसार भारतीय कमांडर अभिनंदन यांना सुरक्षित भारतात सोडण्याची मागणी केली आहे.