तो मंत्री बनून गेला गोव्याला, ‘मसाज’मुळं घेतला सरकारी ‘पाहूणचार’

पणजी : वृत्तसंस्था – मंत्री असल्याचा बनाव करुन पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यात उत्तर प्रदेशातील सुनील कुमार सिंगने तब्बल 12 दिवस सरकारी खर्चात पर्यटन केले. त्यानंतर एक दिवस मसाजमुळे त्याची पोलखोल झाली. आता त्याला पोलीसांचा पाहुणचार मिळत आहे. लखनऊचा असलेल्या सुनील कुमारला पोलीसांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनील कुमार सिंग हा लखनऊचा आहे. त्याने आपण उत्तर प्रदेशातील मंत्री असल्याचे सांगून जवळपास दोन आठवडे सरकारी सुविधांचा फायदा घेतला. त्याला राज्याच्या पाहुण्यांसाठी असलेल्या सर्व सेवासुविधा मिळाल्या. यामध्ये सरकारी गाडी, एक पोलीस अधिकारी त्याला पर्यटनासाठी सोबत देण्यात आला होता. एवढेच नाही तर दक्षिण गोव्यातील एका कार्यक्रमात त्याला प्रमुख पाहुणेही करण्यात आले होते.

मंत्री असल्याचे सांगून तेवढ्यावरच सुनील कुमार थांबला नाही. त्याने ड्रिंकवेळी मसाज करण्यासाठी तरुणीची मागणी देखील केली होती. त्यानंतर पोलीसांना संशय आला. चौकशी केल्यानंतर पोलीसांनी त्याला अटक केली. सुनील कुमारने गोव्यातील प्रोटोकॉल डिपार्टमेंटला एक मेल केल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर सुनील कुमारसाठी तीन दिवसांसाठी एक रुम बूक करण्यात आली होती.

सुनील कुमारबद्दल सांगायचे झाले तर तो उत्तर प्रदेशात एका कोऑपरेटिव्ह सोसायटीचा माजी उपाध्यक्ष आहे. त्याच्याकडे राज्याचे कोऑपरेटिव्ह मंत्री गोविंद यांचे शिफारसपत्र होते. मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण गोव्यात एका कार्यक्रमात त्याला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. तेव्हा सुनील कुमारने 10 कोटी देण्याचे आश्वासन देखील दिले होते. आता त्याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/