आपल्या शहराला भारतातील सर्वोत्तम राहण्यायोग्य बनविण्यासाठी सूचना पाठवा

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

लोक सहभागातून सर्व समावेशक व शाश्वत प्रगती करून २०३० पर्यंत पिंपरी चिंचवड शहराला भारतातील सर्वोत्तम राहण्यायोग्य शहर बनविण्याचे ध्येय गाठण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असून त्याकरिता नागरिकांनी शहर विकासाबाबतच्या आपल्या सूचना व कल्पना ७ दिवसांमध्ये महानगरपालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागामध्ये लेखी स्वरुपात अथवा [email protected] या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने सादर कराव्यात असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले. ​शहरातील विविध समाजिक संस्थांचे पदाधिकारी व विविध प्रसारमाध्यमांचे संपादक यांच्या समवेत पिंपरी चिंचवड शहर विकासाचे धोरण व शहर परिवर्तन आराखड्याबाबत चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.
[amazon_link asins=’B01MURKA7W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’be1a180b-af6c-11e8-b6a3-2b95be302085′]

स्थायी समिती सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या चर्चा सत्रास अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, पॅलेडीयम संस्थेच्या बार्बरा स्टॅंकोव्हीकोवा, किरण पंडित, मधुरा पाठक, रॉकी ओलांडे, विविध वृत्तपत्रांचे संपादक, ज्येष्ठ नागरिक महासंघ, संस्कार प्रतिष्टान, पोलिस मित्र संघटना, अविरत फौंडेशन, जलदिंडी, दक्षता मित्र मंडळ, पर्यावरण संवर्धन समिती, प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय, राजश्री शाहू महाविद्यालय, इंदिरा कॉलेज, बाबूरावजी घोलप महाविद्यालय, रोटरी क्लब वालेकरवाडी/अंघोळीची गोळी, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, निरामय हॉस्पिटल, बिर्ला हॉस्पिटल आदी संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

जाहिरात

आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पिंपरी चिंचवड शहर विकासाचे धोरण व शहर परिवर्तन आराखड्याचे सादरीकरण यावेळी केले. यामध्ये शहरातील वाहतूक व्यवस्था, पर्यावरण, राहणीमान, क्रीडा, पर्यटन, सांस्कृतिक उपक्रम, कायदा व शासन व्यवस्था, माहिती तंत्रज्ञान, दळणवळण यंत्रणा, आर्थिक विकास याबाबत नागरिकांनी सिटी सर्वे मध्ये नोंदवलेली मते सादर करण्यात आली. तसेच २०३० पर्यंतचे पिंपरी चिंचवड शहराचे ध्येय व उदिष्ट मांडण्यात आली. शहर विकासाचे ध्येय व उदिष्ट साध्य करण्यासाठीचा सविस्तर आराखडा यावेळी आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी उपस्थितांसमोर सादर केला.

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, पिंपरी चिंचवड शहर कष्टकरी कामगारांनी आपल्या घामाने मोठे केलेले शहर आहे. राज्याच्या सर्व भागातील नागरिक आज पिंपरी चिंचवड शहरात राहताना आपल्या दिसून येतात. गेल्या दोन दशकात वेगाने वाढणारं शहर म्हणून आपल्या शहराचा देशात तिसरा क्रमांक लागतो. शहर विकासाचा दर ७०% इतका असून तो इतर शहरांपेक्षा जास्त आहे. परंतू बदलत्या काळामुळे आज अनेक उद्योग शहराबाहेर जात आहेत व रहिवासी शहर म्हणून नविन ओळख प्राप्त होत आहे.
[amazon_link asins=’B079QPY84C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d4380539-af6c-11e8-82e8-717e76a9f6e7′]

त्यामुळे शहर विकासाबरोबरच झोपडपट्ट्या, अनधिकृत बांधकाम, आरोग्य, शिक्षण आदी बाबतच्या समस्या देखील वाढत आहेत. त्या सोडविण्यासाठी एकात्मिक आराखडा तयार करावा लागेल. २०३० पर्यंत पिंपरी चिंचवड शहर हे देशातील क्र. १ चे सर्वसमावेशक, आर्थिकदृष्ट्या प्रगत व राहण्यायोग्य शहर बनविण्याचे ध्येय असून व्यवसायासाठी सुलभ व सोपी कार्यप्रणाली राबविणे आणि नागरिकांची जीवनशैली, गुणवत्ता सुधारण्यास प्रोत्साहन देण्यासाठी नागरिक केंद्रित स्मार्ट प्रशासन सुनिश्चित करण्याचे उदिष्ट महानगरपालिकेने ठेवले आहे. कार्यक्षमता, सचोटी, जबाबदारी, संघटीत कार्य संवेदनशीलता हि मुल्ये आत्मसात करूनच निश्चित केलेले ध्येय व उदिष्ट साध्य होऊ शकते असेही ते यावेळी म्हणाले.

आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्याच्या कार्यालयात नगरसेवकाने सोडले डुक्कर 

शहर विकासाचा सर्व समावेशक आराखडा तयार करणेसाठी जास्तीत जास्त नागरिकांनी शहर विकासाबाबतच्या आपल्या सूचना व कल्पना ७ दिवसांमध्ये महानगरपालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागामध्ये लेखी स्वरुपात अथवा [email protected] या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने सादर कराव्यात असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

जाहिरात