ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यासह तिघांवर 1 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांच्यासह तिघांवर 96 लाख 99 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 14 जणांची त्यांनी फसवणूक केली आहे.

याप्रकरणी अभिनेते विक्रम गोखले तसेच जयंत रामभाऊ महाळगी आणि त्यांची पत्नी सुजाता महाळगी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जयंत प्रभाकर बहिरट (वय 57, रा. कोथरूड) यांनी पौड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चित्रकार आहेत. दरम्यान मुळशी तालुक्यातील डोंगरगाव येथे सुजाता फार्म प्रा.लि. गिरीवन प्रोजेक्ट या कंपणीचे जयंत व सुजाता महाळगी हे डायरेक्टर आहेत. तर विक्रम गोखले हे चेअरमन आहेत.

गोखले यांनी ही कंपनी एक सरकार मान्य प्रोजेक्ट असल्याचा दावा केला. तसेच त्याबाबत खोट्या जाहिराती करून प्रलोभने देऊन नागरिकांना आकर्षित केले. तसेच रामभाऊ महाळगी यांच्या सामाजिक प्रतिमेचा व प्रसिद्धीचा फायदा घेतला.

त्यांनी फिर्यादी व इतर फसवणूक झालेल्या फ्लॅट धारकांना प्लॉटची सरकार मोजणी झाली असल्याचे सांगून आम्ही वकील असून, कायदेशीर बाबीची चिंता करू नये असे सांगितले. त्यामुळे फिर्यादी व इतरांनी याठिकाणी प्लॉटची खरेदी केली. दरम्यान त्यांनी खरेदी केलेले प्लॉट सरकारी मोजणी करून देत नव्हते.

यामुळे प्लॉट धारकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे नियमाप्रमाणे अर्ज करून त्यांच्याकडून विना हरकत मोजण्या करून घ्याव्यात असा अर्ज दाखल केला. त्यावर निर्णय होऊन आदेश देण्यात आला. मात्र तिघे मोजणी करण्यासाठी वेळोवेळी हरकत घेत असल्याचे लक्षात आले. तरीही त्यांनी मोजणी करून घेतली असता त्यांना फसवणूक झाली असल्याचे लक्षात आले.

त्यांनतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. तक्रार दिल्यानंतर त्याची प्राथमिक चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जमिनीची विक्रीकरून 14 जणांची एकूण 96 लाख 99 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. अधिक तपास पौड पोलीस करत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like