न्यायालयीन अवमान प्रकरण : वकील प्रशांत भूषण यांना अखेर उपरती ; म्हणे चूक झाली…! 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – न्यायालयीन अवमानामध्ये अडकलेल्या वरिष्ठ वकील प्रशांत भूषण यांना अखेर उपरती झाली आहे. न्यायालयाचा अवमान झाल्याची चूक त्यांनी अखेर मान्य केली आहे. सिबीआयचे अंतरिम संचालक एम. नागेशवर राव यांच्या नियुक्तीदरम्यान झालेल्या उच्चाधिकार निवड समितीच्या बैठकीच्या वृत्तांताला त्यांनी काल्पनिक असा उल्लेख करीत ट्विट केले होते. भूषण यांनी केंद्र सरकारने काल्पनिक वर्णन न्यायालयामध्ये सादर केल्याचे म्हटले होते.

सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती अरुण मिश्रा आणि न्यायमूर्ती नवीन सिन्हा यांच्या खंडपीठासमोर ॲटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांनी प्रशांत भूषण यांच्या विरोधातील अवमान याचिका मागे घेणार असल्याचे सांगितले. दरम्यान अवमान याचिकेवर न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांनी बाजूला व्हावे अशी मागणी भूषण यांनी केली. ही मागणी करत त्यांनी बिनशर्त मागणी मागण्यास नकार दिला.

प्रशांत भूषण यांना शिक्षा व्हावी अशी कोणतीही भूमिका नव्हती आणि यावर ठाम असल्याचे ॲटर्नी जनरल वेणुगोपाल यांनी स्पष्ट केले. दरम्यान न्यायालयीन अवमान प्रकरण गंभीरतेने घेतले आहे. जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी कोणी व्यक्ती न्यायालयीन अवमान कशी काय करू शकते ? यावर व्यापकतेने विचार करणार असल्याचे सांगितले. या प्रकरणावर पुढील सुनावणी ३ एप्रिलला होणार आहे.