शिक्षण विभागातील वरिष्ठ सहायकास पाच हजारांची लाच घेताना अटक

बीड : पोलीसनामा ऑनलाईन

सर्व्हीसबुकमध्ये नोंदी घेऊन ते परभणी जिल्हा परिषदमध्ये पाठविण्यासाठी पाच हजारांची लाच स्विकारताना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील वरिष्ठ सहायकास अटक करण्यात आली. ही कारवाई आज (बुधवार) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बीड येथील नगर रोडवर असलेल्या हाॅटेल मेघराजजवळ करण्यात आली.
[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3e2021c7-ab95-11e8-a494-7b14953e1255′]

राजेंद्र श्रीरंग ओव्हाळ (वय-४२) असे अटक करण्यात आलेल्या वरिष्ठ सहायकाचे नाव आहे. याप्रकरणी एका सेवनिवृत्त शिक्षकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

पोलीस अधीक्षकांना भेटण्यासाठी निघालेल्या निरीक्षकांच्या गाडीला अपघात

तक्रारदार हे सेवानिवृत्त झाले असून त्यांच्या सेवापटलावर नोंदी करुन ते परभणी जिल्हा परिषदेमध्ये पाठवायचे होते. या कामासाठी ओव्हाळ याने त्यांच्याकडे पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. ही रक्कम बीड येथील नगररोडवर असलेल्या हॉटेल मेघराज येथे देण्याचे ठरले. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार केल्यानंतर पथकाने या ठिकणी सापळा रचला. ओव्हाळ याला पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली.

पुणे पाेलिसांनी अटक केलेल्या ‘त्या ‘पाचही जणांचे काश्मीरी फुटीरवाद्यांशी संबंध 

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकरा, औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक जिरगे यांचे मार्गदर्शनाखाली बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील, पोलीस निरीक्षक गजानन वाघ, पोलीस कर्मचारी दादासाहेब केदार, अशोक ठोकळ, बापुराव बनसोडे, विकास मुंडे, अमोल बागलाने, राकेश ठाकुर, मनोज गदळे, सखाराम घोलप, भरत गारदे, चालक सय्यद नदीम व म्हेत्रे यांच्या पथकाने केली.