WB : फांदीवर लटकलेला आढळला भाजप आमदाराचा मृतदेह, पक्षाने केला हत्येचा आरोप

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल कॉंग्रेस (टीएमसी) यांच्यात वाद सुरू आहे. या दरम्यान सोमवारी पहाटे पश्चिम बंगालच्या हेमताबादचे भाजपचे आमदार देबेन्द्र नाथ रॉय यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानाच्या बाहेर एका फांदीवर लटकलेला आढळला. या प्रकरणात भाजपने ममता सरकारवर त्यांच्या हत्येचा आरोप केला आहे. दरम्यान, देबेंद्रनाथ रॉय सर्वप्रथम माकपच्या तिकिटावर आमदार झाले. यानंतर 2019 मध्ये ते भाजपमध्ये दाखल झाले.

भाजपचे आमदार देवेन्द्र नाथ रॉय यांच्या हत्येच्या प्रकरणात भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांनी ममता सरकारवर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत लिहिले की, ‘निंदनीय आणि भ्याड कृत्य !!! ममता बॅनर्जी यांच्या कारकिर्दीत भाजप नेत्यांची हत्या थांबली नाही. टीएमसी सोडून भाजपामध्ये रुजू झालेले हेमताबादचे आमदार श्री. देवेन्द्र नाथ रॉय यांची हत्या करण्यात आली. त्यांचा मृतदेह फांदीवर लटकलेला आढळला.

कैलास विजयवर्गीय यांनी प्रश्न उपस्थित करत म्हंटले की, त्यांचा गुन्हा फक्त भाजपात येणे हा होता? … ‘दरम्यान यापूर्वीही पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि टीएमसी यांच्यात बर्‍याच वेळा वाद पाहायला मिळाले आहे. लोकसभा निवडणुकीतही दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि समर्थक यांच्यात चकमकीच्या अनेक घटना उघडकीस आल्या.

दोन आठवड्यांपूर्वी पश्चिम बंगालमधील पूर्व मिदनापूर येथे भाजप नेते पबित्र दास गोळी लागल्यामुळे जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांनी टीएमसीच्या गुंडांनी हल्ला केल्याचा आरोप केला. त्याचवेळी, भाजपने म्हटले होते की, राज्यात पोलिस आणि टीएमसी गुंडांमध्ये मिलीभगत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like