भारत जिंकल्याच्या आनंदात क्रिकेट चाहत्याचा हृदयविकाराने दुर्देवी मृत्यू

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाईन – काल झालेल्या अफगाणिस्तान विरुद्ध भारत या सामन्याने क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. भारतासाठी सहज वाटणारा या सामन्यात चांगलीच चुरस पहायला मिळाली आहे. या सामन्याने भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या काळजाचे ठोके चुकवले. या चुरशीच्या सामन्यात भारताचा विजय झाला असला तरी एका क्रिकेट चाहत्याला या चुरशीचा सामन्यामुळे जीव गमवावा लागला.

भारताला विजय मिळाल्याच्या आनंदात गणपत जानू घडशी (६८) यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्देवी मृत्यू झाला. रत्नागिरी जिल्ह्याच्या संमेश्वर तालुक्यातील आंबव (पोंक्षे) गावचे रहिवासी असणारे गणपत घडशी हे क्रिकेटचे चाहते होते. शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर ते गावीच रहात होते. सेवेत असल्यापासूनच क्रिकेट हा त्यांचा आवडीचा विषय होता.

रविवारी रात्री ११ वाजेच्या दरम्यान अफगाणिस्तान विरुद्ध भारत या सामन्यात चांगलीच चुरस पहायला मिळाली. भारत जिंकेल असे शेवट्पर्यंत सांगता येत नव्हते. शेवटची ओव्हर मोहम्मद शमी टाकत होता. त्याच्या ओव्हरमधील पहिल्याच चेंडूवर चौकार लगावला गेला. यावेळी गणपत यांनी रागही व्यक्त केला पण त्याच षटकात मोहम्मद शमीने शानदार हॅट्रिक करत भारताला विजय मिळवून दिला. भारताने विजय मिळवल्यानंतर ते आराम खुर्चीतून दोन हात वर करत ताड्कन उठले, अरे आपण जिंकलो ! भारताचा विजय झाला असे मोठ्याने ओरडले आणि धाडकन जमिनीवर कोसळले.

तेवढ्यात मुलगा मंगेशने त्यांना सावरले. पण तेव्हाच त्यांनी शेवटचा श्वास सोडला. घडलेल्या या प्रकाराने गोंधळून गेलेल्या कुटुंबाने त्यांना माखजन प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले पण तत्पूर्वीच त्यांचं निधन झाले होते. रविवारी दुपारी आंबव घडशी वाडी येथील स्मशानात त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

आरोग्य विषयक वृत्त – 

आहारा संबंधीचे काही ‘समज-गैरसमज’, जाणून घ्या ‘सत्य’

मसाल्याचे पदार्थ आरोग्यासाठी लाभदायक, होतात अनेक फायदे

स्लीम व्हायचंय का ? या उपायांनी सहज कमी होईल पोट

‘हे’ उपाय केले तर चष्मा लागणार नाही, नंबर वाढणार नाही