पेन देण्याचं दाखवलं 62 वर्षाच्या म्हातार्‍यानं आमिष, 11 वर्षाच्या मुलीवर केला बलात्कार

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – पेन गिफ्ट देण्याचे आमिष दाखवून 11 वर्षीय मुलीवर 62 वर्षाच्या दुकानदार वृद्धाने लैंगिक अत्याचार केला. सदर घटना नागपूरमधील जरीपटका या भागात घडली. पीडित मुलगी सहावीत शिकत आहे. गुल्लूबाबा उर्फ उमेश शंकरराव गुरलवार असे आरोपीचे नाव आहे. सदर घटना डॉक्टरमुळे उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी सप्टेंबरमध्ये महिन्यात पेन विकत घेण्यासाठी वस्तीत असलेल्या जनरल स्टोअर्समध्ये गेली असताना दुकानदाराने तिला पेन गिफ्ट देण्याचे आमिष दाखवले. पेन गिफ्ट देण्याच्या बदल्यात त्याने तिला दुकानाच्या आतमधल्या खोलीत नेऊन तिच्याशी अश्‍लिल चाळे करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि सदर घटनेची कुठेही वाच्यता न करण्याची धमकी दिली. पीडित मुलीचे आईवडील मोलमजुरी करतात. भीतीपोटी मुलीने आईवडीलांना या प्रकाराची माहिती दिली नाही. त्यामुळे हे प्रकरण दडपले गेले.

3 नोव्हेंबरला दुपारी पीडित मुलगी फाईल आणण्यासाठी दुकानात गेली असताना पुन्हा तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. 4 नोव्हेंबरला पीडित मुलीने पोट दुखत असल्याची तक्रार आईकडे केली. सायंकाळच्या सुमारास आईने तिला डॉक्‍टरकडे नेले. डॉक्‍टरांनी तपासणी केली असता तिच्या अंगावर नखाचे ओरबडे आणि गुप्तांगावर जखमा दिसल्या. डॉक्‍टरांनी मुलीला विश्‍वासात घेऊन विचारपूस केल्यानंतर दुकानदाराने बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची माहिती दिली. पीडितेच्या आईने या घटनेविषयी जरीपटका पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे . पोलिसांनी तक्रारीवरून गुल्लूबाबा गुरलवार याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करीत अटक केली.

Visit : Policenama.com