मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांऐवजी नितीन गडकरींच्या नावाची चर्चा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राज्यातील सत्ताकोंडी फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना राज्यात पाठवण्यात येणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ऐवजी नितीन गडकरी यांच्या नावाची चर्चा सध्या राज्याच्या वर्तुळात जोर धरु लागली आहे. विधानसभेच्या निकालानंतर भाजप-शिवसेनेत मुख्यमंत्रीपदावरून संघर्ष सुरु आहे

महारष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा आज देखील सुटलेला नाही. देवेंद्र फडणवीस यांना हटवण्याची मागणी होत असताना आता गडकरींच्या नावाचीही चर्चा होत आहे. मुख्यमंत्री पदावर शिवसेनेने दावा केला आहे. तर भाजप मुख्यमंत्रीपद शिवसेनेला देण्यास तयार नाही. शिवसेनेने सत्तेमध्ये जागा वाटपात समान वाटा मागितला आहे. मात्र, भाजपने मुख्य खात्यांसह मुख्यमंत्रीपद देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे निकालानंतर 13 दिवस उलटले तरी अद्याप सरकार स्थापन झाले नाही.

दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय असलेल्या अहमद पटेल यांनी बुधवारी गडकरी यांची दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत काय चर्चा झाली, याची माहिती मिळू शकलेली नाही. पण, अहमद पटेल यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजप-शिवसेनेतील वादावर तोडगा काढण्याची जबाबदारी गडकरींवर दिली आहे.

Visit : Policenama.com