काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांची प्रकृती चिंताजनक, ICU मध्ये उपचार सुरु

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल (senior-congress-leader-ahmed-patel) यांची प्रकृती चिंताजनक (condition-critical) असल्याचे सांगण्यात येत आहे. पटेल यांना मेट्रो रुग्णालयातून गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल केले आहे. पटेल यांना ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाची बाधा झाली होती. त्यावेळी त्यांनी स्वत:च ट्विट करून याबाबतची माहिती दिली होती.

1 ऑक्टोबर रोजी अहमद पटेल यांनी ट्विट करून कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली होती. कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येण्यापूर्वी काही दिवस आधी त्यांनी संसदेच्या पावसाळी आधिवेशनात सहभाग घेतला होता. राज्यसभेचे खासदार असलेल्या अहमद पटेल यांनी तेव्हा सांगितले होते की, तपासामध्ये मला कोविड -19 चा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कामध्ये आलेल्या लोकांनी स्वत:ला क्वारेंटाईन करावे, असे आवाहन त्यांनी केले होते.