काॅंग्रेसचे जेष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्या घरात हिऱ्यांची चोरी

चेन्नई: वृत्तसंस्था
काँग्रेसचे जेष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्या तामिळनाडू येथील घरात चोरी झाल्याचे वृत्त आहे. त्यांच्या घरातून हिरे ,सोने आणि एक लाख दहा हजाराच्या रक्कमेवर चोरांनी डल्ला मारला आहे. या चोरीबाबत नुंगमबक्कम पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस या घटनेबाबत आधी तपास करीत आहेत.

[amazon_link asins=’B078LQ1W9Q’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3e81d045-828b-11e8-ae8f-f533c27fb1e2′]

काँग्रेस नेते यांच्या घरी झालेल्या चोरीचा तपास पोलीस करीत आहेत. या आधी देखील चिदंबरम यांच्या तामिळनाडूतील नुंगमबक्कम येथील घरी चोरी झाली आहे. तसेच या प्रकरणाआधी चिदंबरमयांच्या एका नातेवाईकाचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती. सध्या आयएनएक्स मीडिया प्रकरणी चिदंबरम यांची डोकेदुखी वाढली असताना आता त्यात या चोरीच्या घटनेची भर पडली आहे.