पक्षापेक्षा मुलांच्या हिताला दिलं अधिक महत्व ; राहुल गांधींचा ‘या’ जेष्ठ नेत्यांवर आरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीतील पराभावाची समीक्षा करण्यासाठी काँग्रेसच्या संसदीय मंडळाची बैठक शनिवारी बोलावण्यात आली होती. त्यामध्ये राहुल गांधी यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि पी. चिदंबरम यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या नेत्यांनी पक्षहितापेक्षा स्वत:च्या मुलांना अधिक महत्त्व दिले तसेच काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर पक्षाच्या नेत्यांनी म्हणावे तसे गांभीर्य दाखवले नाही.
असे आरोप करत नाराजी व्यक्त केली.

या बैठकीत राहुल गांधी म्हणाले की, तिकीट वाटपाच्यावेळी ज्योतिरादित्य सिंधिया यांनी स्थानिक नेत्यांना संधी द्यावी, असे सुचवले होते. मात्र, या नेत्यांनी आपल्या मुलांनाच उमेदवारी मिळवण्यासाठी दबावतंत्र वापरले. ज्या राज्यांमध्ये कांग्रेसची सत्ता आहे अशा राज्यांमध्ये पक्षाची कामगिरी अत्यंत खराब झाली. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आपापल्या मुलांना उमेदवारी देण्यासाठी आग्रह धरला, मात्र मी त्याबाबत फारसा अनुकूल नव्हतो. दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या मुलांना विजयी करण्यावर जास्त लक्ष केंद्रीत केलं. नरेंद्र मोदींविरोधात उपस्थित केलेले मुद्दे त्यांनी लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहचवले नाहीत. ‘

.. तर काँग्रेसचे कार्यकर्ते आत्महत्या करतील : पी. चिदंबरम

कॉंग्रेस कार्यकारिणीच्या झालेल्या या बैठकीत राहुल गांधी यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊ केला. मात्र काँग्रेस नेत्यांनी त्याला विरोध केला आहे. मात्र राहुल गांधी अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याविषयी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यास दक्षिण भारतातील काँग्रेसचे कार्यकर्ते आत्महत्या करतील असे वक्तव्य माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केले आहे.

तर काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद म्हणाले की, राहुल यांच्या नेतृत्वाची कॉंग्रेसला आवश्यकता आहे. राहुल गांधी राष्ट्रीय स्तरावर विरोधी पक्षाची भूमिका चांगली बजावू शकतात.