IMA बीड तर्फे वरीष्ठ डाॅक्टरांचा सन्मान

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – ७१ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शुभप्रहरी आय. एम.ए. बीड शाखेच्या वतीने बीडच्या वरिष्ठ व शाखेच्या माजी अध्यक्षांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ.अशोक थोरात व आय.एम.ए.बीड शाखेचे अध्यक्ष डाॅ.अनिल बारकुल यांच्या हस्ते हा सत्कार सोहळा संपन्न झाला.

ज्या काळी तपासणीच्या कसल्याही सुविधा नव्हत्या व केवळ लक्षणे आणि रुग्णाची शारीरिक तपासणी करुन अचूक रोग निदान करुन प्राण वाचवणा-या या देवदूतांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी डाॅ. बी. आर.पंडीत, डाॅ.एस.एल. लहाने, डॉ.अरुण निरंतर, डॉ. रोहिणी वैद्य, डॉ. गोपाळ मेखे, डाॅ. सी.ए.गायकवाड, डाॅ. टी. एल. देशमुख, डाॅ.के. बी. पैठणकर, डाॅ.के .डी. पाखरे, डाॅ. दिलीप खरवडकर, डाॅ. यशवंत खोसे आदी वरीष्ठ डाॅक्टरांचा सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. वरील सर्व सिनियर डाॅक्टरांनी मनापासून आनंद व्यक्त केला व आपला वारसा पुढे चालू ठेवणा-या तरुण डाॅक्टर मंडळींचे भरभरून कौतुक केले. या विविध तपासणी करण्याच्या काळात देखील पेशंटची क्लिनिकल एक्झामिनेशन करुन डायग्नोसिस करने आवश्यक आहे असे आवर्जून सांगितले. तसेच वैद्यकीय व्यवसायाला असलेली प्रतिष्ठा जपून सामाजिक भान ठेवून रुग्णसेवा चालू ठेवावी असा मौलिक सल्ला देखील त्यांनी नविन डाॅक्टरांना दिला.

या कार्यक्रमात डाॅ. अनिल बारकुल यांनी गेल्या वर्षभरात आय.एम.ए.ने केलेल्या विविध कार्यक्रमांचे स्लाईड शो द्वारे सादरीकरण केले व उपस्थितांना माहीती दिली. तसेच डॉ. कु. गिते हिची कलेक्टर पदी निवड झाल्याबद्दल व नीट परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन केल्याबद्दल डॉ. संजीवनी कोटेचा, डॉ. किशोर शिरपूरकर यांच्या पाल्याचा विशेष सत्कार करण्यात आला.

यानंतर आय.एम.ए. बीड शाखेची सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सचिव डाॅ. विनोद ओस्तवाल यांनी सुत्रसंचालन केले. या प्रसंगी डाॅ. पी. के. कुलकर्णी, डाॅ. यु. डी. कुलकर्णी, डाॅ. शिरपूरकर, डाॅ. एल. एम. पंडीत, डाॅ. सौ. खरवडकर, डॉ. व्ही. एल.जाधव, डाॅ. डुंगरवाल, डाॅ. प्रमोद शिंदे, डॉ.पालवणकर, डाॅ. शिवाजी सानप, डॉ. गुळजकर सह अनेक डाॅक्टरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डाॅ. अनुराग पांगरीकर, डाॅ. अमोल गिते, डाॅ. सुशांत योगे, डाॅ. सौ. बारकुल, डाॅ. सौ. ओस्तवाल, डॉ. प्रज्ञा तांबडे यांनी परिश्रम घेतले.

You might also like