वरिष्ठ IPS अधिकारी के. वेंकटेशम, संदीप बिश्रोई, विवेक फणसळकर यांना पदोन्नती अन् बदली; ठाण्याच्या आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार ‘या’ अधिकार्‍याकडे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्य गृह विभागाने आज (मंगळवार) 3 अप्पर पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकार्‍यांच्या पदोन्नतीवर बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये के. वेंकटेशम, संदीप बिश्रोई आणि विवेक व्ही. फणसळकर यांचा समावेश आहे. सध्या तरी ठाणे पोलिस आयुक्त पदाचा पदभार ठाणे पोलिस आयुक्तालयात सह आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या सुरेश मेखला यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

पदोन्नतीने बदली करण्यात आलेल्या अप्पर पोलिस महासंचालकांचे नाव आणि त्यापुढील कंसात कोठून कोठे बदली झाली हे पुढील प्रमाणे –

1. के. वेंकटेशम (अप्पर पोलिस महासंचालक (विशेष कृती अभियान), महाराष्ट्र राज्य मुंबई ते संचालक नागरी संरक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई)

2. संदीप बिश्रोई (अप्पर पोलिस महसंचालक, लोहमार्ग, महाराष्ट्र राज्य, मुंबई ते महासंचालक (न्यायिक व तांत्रिक), महाराष्ट्र राज्य, मुंबई)

3. व्ही.व्ही. फणसळकर (पोलिस आयुक्त, ठाणे शहर ते व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित, मुंबई)