‘नागरिकत्व’ विधेयकाला विरोध दर्शवत वरिष्ठ IPS अधिकार्‍यानं ‘या’ कारणामुळं दिला राजीनामा, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – नागरिकत्व दुरूस्ती विधेयक लोकसभेत आणि राज्यसभेत पास झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य पोलिस दिलातील आयपीएस अधिकारी अब्दूर रेहमान यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्याबाबत त्यांनी एक पत्र देखील दिले असून ते सध्या मोठया प्रमाणावर व्हायरल झाले आहे.

भाजप सरकारकडून सर्वप्रथम लोकसभेत आणि त्यानंतर आज राज्यसभेत हे विधेयक मांडण्यात आलं. दोन्ही सभागृहात नागरिकत्व दुरूस्ती विधेयक मंजूर झाल्यानंतर समाजाच्या वेगवेगळया स्तरातून याबाबत प्रतिक्रिया उमटत असतानाच महाराष्ट्र राज्य पोलिस दलातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी अब्दुर रेहमान यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आले आहे. याबाबत पोलीसनामा ऑनलाइनने त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी होय, आपण नागरिकत्व दुरूस्ती विधेयकास विरोध दर्शवत पदाचा राजीनामा दिला असल्याचे सांगितले. अब्दूर रेहमान हे 1997 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.

फेसबुक पेज ला लाईक करा : https://www.facebook.com/policenama/