ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित यांचं पुण्यात निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित (वय 67) यांचं आज (सोमवार) निधन झालं आहे. गेल्या अनेक वर्षात ते पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत होते. अनेक अग्रेसर वृत्तपत्राचे ते संपादक देखील होते. अत्यंत मनमिळावू स्वभावचे अनंत दीक्षित यांचं सोमवारी पुण्यातील एका खासगी रूग्णालयात निधन झालं आहे.

दीक्षित यांच्या निधनाचं वृत्त काही वेळापुर्वीच हाती आले आहे. अनेक सामाजिक कार्यामध्ये ते आवर्जून सहभागी होत. राजकीय विश्लेषक म्हणून त्यांची भुमिका पार पाडली आहे. अनेक वृत्तवाहिन्यांवर ते राजकीय विश्लेषक म्हणून त्यांची भुमिका मांडत होते.

दीक्षित यांच्यावर बुधवारी (११ मार्च) सकाळी नऊ वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशामभुमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

त्यांची कन्या अमृता स्कॉटलंडमध्ये असते. ती मंगळवारी संध्याकाळपर्यंत परतेल. त्यानंतर बुधवारी सकाळी अंत्यसंस्कार होतील, असे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले.