Senior Journalist Digambar Darade | ज्येष्ठ पत्रकार दिगंबर दराडे लिखीत ‘ऋषी सुनक’ येणार 5 भाषेत, वाचकांचा उदंड प्रतिसाद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Senior Journalist Digambar Darade | ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (UK PM Rishi Sunak) यांच्यावर पत्रकार दिगंबर दराडे यांनी लिहिलेलं पुस्तक बेस्ट सेलर (Best Seller Book) ठरत आहे. अवघ्या एका महिन्यांमध्ये तब्बल पाच आवृत्या निघाल्या आहेत. हे पुस्तक हिंदी, इंग्लिश, कन्नड, गुजराथी सह जर्मन भाषेतही काढण्यात येणार आहे. (Senior Journalist Digambar Darade)

 

लंडन येथे जाऊन दराडे यांनी आपल्या पुस्तकामध्ये सुनक यांच्या व्यक्तीमत्वाच विविध पैलू उलगडले आहेत. युवक युवतींकडून मोठा प्रतिसाद असल्याचे दिगंबर दराडे यांनी सांगितले. ते म्हणाले, युवक आणि युवतीकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. लंडनमध्ये राहत असलेल्या आणि तिकडे शिक्षण पूर्ण करून आलेल्या तरूणांच्याकडून या पुस्तकाचे विशेष कौतुक होत आहे.

 

इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती (Infosys Founder Narayana Murthy) व सुधा मूर्ती (Sudha Murthy) यांचे ते जावई आहेत. ज्या देशाने आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केले त्या देशाचा पंतप्रधान एक भारतीय वंशाचा आणि हिंदू आहे. या अभूतपूर्व घटनेने भारतीय म्हणून आपली छाती नक्कीच फुलून येत आहे. (Senior Journalist Digambar Darade)

 

एक स्थितप्रज्ञ, हिंदू संस्कृतीचा अभिमान बाळगणारे, मंदिरात जाऊन पूजा करणारे गोपूजा करणारे, गीतेवर हात ठेवून खासदारकीची शपथ घेणारे ब्रिटनचे पंतप्रधान पाहून भारतीयाला त्यांचा अभिमान वाटतो आहे. आपले कर्तव्य हाच आपला धर्म आहे हा विचार पक्का करून ते जोमाने कामाला लागले आहेत दिवस-रात्र मेहनत करत आहेत.

माय मिररचे (MyMirror Publishing House) मनोज अंबिके (Manoj Ambike) म्हणाले, ऋषी यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाला
चांगला प्रतिसाद मिळत आहे. आम्ही एक महिन्यामध्ये पाच आवृत्त्या काढलेल्या आहेत. तरूणांची माागणी या पुस्ताला दिवसेंदिवस वाढत आहे.
ऋषी सुनक यांच्या बद्दलचे मराठीतील हे पहिले असल्याने विशेष आकर्षण ठरत आहे. ऋषी आणि अक्षता मुर्तींची लव्हस्टोरी,
मुर्ती कुंटुबियांचा साधेपणा लोकांना अधिकचा भावत आहे. याच बरोबर दराडे यांनी अतिशय साध्या सोप्या भाषेत लेखन केले आहें.
म्हणून आम्ही हे पुस्तक विविध भाषांमध्ये आणण्याच काम सुरू केले असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Advt.

राजकीय नेत्यांच्या सोशल मिडियावर ऋषी

कमी वयात यशस्वी झालेल्या ऋषी सुनक यांचा प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)
यांच्या पासून ते पंकजा मुंडे (Pankaja Munde), धनंजय मुंडे (Dhananjay Munde),
उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale), पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil),
रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांच्या सोशल मिडियावर ही या पुस्ताकाची पोस्ट पहायला मिळाली.

 

Web Title :  Senior Journalist Digambar Darade | ‘Rishi Sunak’ written by veteran
journalist Digambar Darade will be available in 5 languages, overwhelming response from readers

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा