मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी एकनाथ गायकवाड !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – माजी खासदार आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांची काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद रिक्तच होते. लोकसभा निवडणुकीत दारूण पराभवाला सामोरे जावं लागल्यामुळे काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

लोकसभा निवडणुकीत मोठ्या फरकाने पराभव झाल्याने काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर एकनाथ गायकवाड यांची मुंबईच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.

एकनाथ गायकवाड पक्षातील ज्येष्ठ नेते आहेत. शिवाय त्यांचे पक्षातील सर्वच नेत्यांसोबत चांगले संबंध असल्याने मुंबईत त्यांच्या नेतृत्वाचा काँग्रेसला फायदाच होईल, त्यामुळे त्यांची मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकनाथ गायकवाड यांनी शिवसेना नेते व लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांचा पराभव केला होता. ते दोनवेळा खासदार म्हणून निवडून आले. २०१४ आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून त्यांना शिवसेनेचे राहुल शेवाळे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला.

आरोग्यविषयक वृत्त –