एकनाथ खडसे भाजप सोडणार का ? पंकजा मुंडे यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

मुंबई – पोलीसनामा ऑनलाईन – पक्षावर नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादी प्रवेशाचे निश्चित झाले असून ते येत्या काही दिवसात प्रवेश करणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितल जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपनेत्या पंकजा मुंडे यांनी पहिल्यांदाच खडसे यांच्या भाजप सोडण्याच्या वृतावर एका वृत्तवाहिनीशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे. खडसे हे भाजपचे अनुभवी आणि ज्येष्ठ नेते आहेत. ते भाजप सोडून जाणार नाहीत याची मला खात्री असल्याचे मुंडे म्हणाल्या.

विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर मुंडे या देखील पक्षावर नाराज होत्या. ती नाराजी त्यांनी अनेकदा जाहीरपणे स्पष्ट केली होती. खडसे आणि मुंडे या दोघांनी एकत्रितपणे काही जाहीर कार्यक्रमात आपल्या मनातील खदखद व्यक्त केली होती. मुंडे यांची भाजपच्या राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती करून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न पक्षाने केला असल्याचे बोलल जात आहे.

राज्यात पावसाने शेतक-यांचे मोठे नकुसान झाले आहे. सरकारने संवेदनशीलपणे निर्णय घेऊन शेतक-यांना मदत करावी, मराठा समाजाला आरक्षण मिळाल पाहिजे. पण ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये, असे त्या म्हणाल्या.

खडसे योग्य निर्णय घेतील- फडणवीस
आमच्या सर्वांची इच्छा आहे की एकनाथ खडसे हे आमच्या सोबत राहिले पाहिजे. राजकारण कसे आहे हे त्यांना चांगले माहित आहे. खडसे यांच्यासोबत योग्य वेळी मी चर्चा करेन. मला पुर्ण विश्वास आहे की ते योग्य निर्णय घेतील असा ,अशी प्रतिक्रिया माजी मुुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.